लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : गुजरात राज्यातील देवमोगरा येथे दर्शनासाठी पायी जाणा:या भाविकांच्या सुरक्षेसाठी गुजरात राज्य पोलीस दलाकडून उपाययोजना करण्याबाबत यंदाही अनास्था दिसून आली़ सोमवारी देवमोगरानजीक अपघात झाल्यानंतर भाविकांच्या चिंता वाढल्या आहेत़ महाशिवरात्रीपासून देवमोगरा, ता़ सागबारा येथे भरणा:या याहामोगी मातेच्या यात्रोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातून साधारण एक लाख भाविक रवाना होतात़ यातही 20 हजार भाविक हे पदयात्रांद्वारे रवाना होत असतात़ अक्कलकुवा मार्गाने गुजरात राज्यात प्रवेश करणा:या यात्रेकरूंना गेल्या काही वर्षात अपघातांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत़ पदयात्रेकरूंची वाढती संख्या पाहता, ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरून धावणा:या वाहनांचे नियोजन करण्याची गरज आह़े बहुतांश यात्रेकरू हे दिवसा किंवा पहाटे प्रवास करत असल्याने यात्राकाळात अवजड वाहनांची वाहतूक वळवणे किंवा त्यांना काही काळ थांबवून पुन्हा मार्गस्थ करण्याबाबत दोन्ही राज्यांनी विचार करण्याची गरज आह़े अक्कलकुवा ते गुलीउंबर या दरम्यान तसेच गुजरात हद्दीतून भरधाव वेगात जाणा:या वाहनांचा वेग या काळात मर्यादित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े यात्रोत्सवासाठी चारचाकी आणि तीनचाकी वाहनाने जाणा:या वाहनांना सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार जिल्ह्यातून देवमोगराकडे जाणा:या व येणा:या वाहनांची गर्दी वाढल्याने अक्कलकुवा ते सोरापाडा या दरम्यान वाहतूक कोंडी होत असल्याने यात्रेकरूंना अडचणी येत असल्याचे चित्र आह़े
देवमोगरा पदयात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:11 PM