ऑनलाईन लोकमत नंदुरबार, दि.2 - वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापा:यांमध्ये संभ्रम होता. माहितीच्या अभावामुळे अनेकांनी जीएसटीची नोंदणीही पूर्ण केली नव्हती. मात्र महिनाभरानंतर व्यापारी जीएसटी समजून घेत व्यवहार करीत आहेत. वाहन विक्रेते, इलेक्टॉनिक्स वस्तू, किराणा, ब्रॅंडेड धान्य, तेलबिया व्यापारी, विविध वस्तूंचे ठोक व्यापारी, कापड विक्रेते, सोने व्यावसायिक, धान्य व्यापारी आणि लघुउद्योजक यांनी जीएसटीला पूर्णपणे स्विकारले आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात नोंदणीकृत व्यापा:यांनी पै-पैचा हिशोब 31 जुलै रोजी ऑनलाईन सादर करत, जीएसटी करप्रणालीचा पहिला भरणा केला आह़े एक देश एक टॅक्स अशी संकल्पना असल्याने बाहेरून आयात करणे व किंवा माल निर्यात करणे, या खर्चात कपात आल्याने द्यावा लागणारा कर हा परवडत असल्याचे मत नंदुरबार शहरातील व्यापा:यांनी व्यक्त केल़े पावसाळ्यात खरेदी विक्रीचा हंगाम नसल्याने येत्या दिवाळीनंतर जिल्ह्यात जीएसटी फायदेशीर ठरला किंवा नाही, हे समजून येणार आह़े
‘जीएसटी’ला समजून घेत व्यापा:यांकडून व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 6:16 PM