शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरदार सरोवर विस्थापीत वा:यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 127 मिटरपेक्षा अधीक पोहचल्याने डुब क्षेत्रातील अनेक बाधीतांना त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 127 मिटरपेक्षा अधीक पोहचल्याने डुब क्षेत्रातील अनेक बाधीतांना त्याचा फटका बसला आहे. शिवाय तळोदा व शहादा तालुक्यातील पुनर्वसन वसाहतींमधील नागरिकांना देखील पावसाच्या पाण्याचा फटका बसला असून अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. शेती वाहून गेली आहे. शासन, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बाधीतांना हे सर्व सहन करावे लागत असल्याचा आरोप नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे. नंदुरबारात सोमवारी जिल्हाधिका:यांशी चर्चा केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मेधा पाटकर म्हणाल्या, नर्मदेत मूळ गावांची सरदार सरोवर बाधित शेती व पुनर्वन वसाहतीतली तळोदा, शहादा तालुक्यातल्या शेकडो जमिनी व 70 घरे बुडाली. विस्थापितांना देण्यात आलेली बहुतांश जमिनी नदी, नाल्यांच्या पूर क्षेत्रातीलच आहेत. तळोदा, शहादा तालुक्यातील निझरी, वाकी, पोसली नदी, मोठे नाले हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत हे या ना त्या कारणाने रोखले वा गाळाने भरले आहेत. यामुळे पाणी लागलीच निघून ते शेतात घुसते. त्यामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. वसाहतीतील विस्थापितांना हा फार मोठा धक्का आहे.31 जुलै 2017 रोजी सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची गावे खाली करण्याचा सुप्रीम कोर्टाने 8 फेब्रुवारी 2017 ला निर्णय दिल्यानंतर हजारो शेतकरी-शेतमजुरांनी मोठाच संघर्ष उभा केला. त्यानंतर मध्यप्रदेशच्या नर्मदा विस्थापितांसाठी 900 कोटींचे पॅकेज जाहीर झाले. महाराष्ट्रातही त्याच सुमारास अनेक बाधितांना जमिनी विकत घेऊन दिल्या गेल्या. तीन नवीन वसाहती निर्माण झाल्या. या परिस्थितीत पूर्ण वसाहत तयार नसताना 38 कुटुंबांचे चिमलखेडी, सिंदुरीवरून स्थलांतर करून पाया बांधणीचे अनुदान न देता घरे बांधायला लावली. काथर्देदिगर, वैजाली, मोड, खरवड, बोरद, करणखेडा यासारख्या वसाहतीत पाण्याचा निचरा, नाले, नद्यांचा पूर्ण विचार हा वसाहत निमार्णाच्या प्रक्रियेत केला नसणे याचे परिणाम कष्टकरी, विस्थापित आदिवासींनाच भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत सरदार सरोवर प्रकल्प व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दोन्ही पूर्ण झाल्याच्या वल्गनाच उघड्या पडल्या आहेत. गुजरात महाराष्ट्राला पुनर्वसनासाठी कायद्यानुसार 30 कोटी देण्याचे व हक्काची वीजही देत नाही तर महाराष्ट्राने आपल्या आदिवासी विस्थापितांना बुडीत भोगू देता कामा नये असे आंदोलनाचे स्पष्ट मत आहे. मूळ गावात आजही निवास करणारी कुटूंबे ही कठीण परिस्थितीत, प्रदूषित पाणीच नव्हे तर बुडित भोगतात, वाहनव्यवस्थाही उपलब्ध नसते. तरीही तिथे याक्षणी डॉक्टरही नाही. विस्थापितांच्या या नुकसानीची भरपाई शासनाने देण्याचा विचार तात्काळ करावा. तशी मागणी केली असल्याचेही मेधा पाटकर यांनी सांगितले. जिल्हाधिका:यांशी चर्चा करणा:यांमध्ये मेधा पाटकर यांच्यासह लतिका राजपूत, चेतन साळवे उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने गुजरातपुढे मान न तुकवता मध्य प्रदेशप्रमाणेच विस्थापितांची खरी संख्या व स्थिती मांडून, विना पूनर्वसन बुडित न आणण्यासाठी गुजरातकडे आवश्यक तर धरणाचे गेट्स खोलण्याची मागणी लावून धरली पाहिजे. त्याचबरोबर पुनर्वन वसाहतींच्या नियोजनातल्या सा:या त्रुटी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी केलीच पाहिजे. संवादातून हे प्रश्न सुटले नाहीत तर 31 जुलै रोजी बडवानी येथे केलेल्या संकल्पाप्रमाणे तीनही राज्यातील हजारो बाधितांकडून संघर्ष हा अटळच असल्याचे आंदोलनाने स्पष्ट केले आहे.