शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आदिवासींच्या ‘टॅलेंट’ला प्रोत्साहन देणारी अनोखी चळवळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:22 PM

टीटीएसएफ फाऊंडेशन : वाढदिवस आणि पुण्यतिथीनिमित्ताने देणगी देण्याची रुढ झाली प्रथा

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासींचे दु:ख आणि समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी समाजातील गुणवंत विद्याथ्र्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देवून त्याला शासकीय सेवेत अधिकारी बनविण्यासाठी स्थापन झालेली टीटीएसएफ ही संस्था आता अधिकच मजबूत होत आहे. विशेषत:  या संस्थेच्या निमित्ताने लगA सोहळा, वाढदिवसानिमित्त देणगी देण्याची आदर्श पायंडा आदिवासी समाजात सुरू झाला आहे. आदिवासींच्या विकासातील मुख्य अडसर शिक्षण आहे. आदिवासींमधील साक्षरता आजही चिंतेचा विषय आहे. शासनाने आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी योजनांमधील त्रुटी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अशाही स्थितीत अनेक आदिवासी तरुण प्रतिकुल परिस्थितीतही  शिक्षणासाठी धडपड करीत आहेत. आदिवासी विद्याथ्र्यामध्ये गुणवत्ताही अधिक असली तरी या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य असे व्यासपीठ नाही. या युवकांना योग्य मार्गदर्शनही नाही. त्यामुळे गुणवत्ता असली तरी विद्याथ्र्याचे करियर घडविण्यासाठी पाठबळ व व्यासपीठ नसल्याने अनेक आदिवासी युवक शिक्षण घेवून बेरोजगारीची शिक्षा भोगत आहेत. गेल्या चार, पाच वर्षात राज्यात प्रथमच अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून संघर्ष करीत डॉ.योगेश भरसळ, डॉ.राजेंद्र भारूड, अजय खर्डे यासारखे तरुण आयएएस, युपीएससी या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत  दाखल झाले आहेत. त्यांचीच प्रेरणा घेत नव्हे तर मार्गदर्शनानुसार नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी अधिका:यांनी आदिवासी विद्याथ्र्यामधील गुणवत्ता शोधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व त्यांचे करियर घडवावे यासाठी ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन अर्थात टीटीएसएफची स्थापना करून गेल्या दोन वर्षापासून एक अभिनव चळवळ राबवीत आहे.या फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्यासाठी खास प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेतून विद्याथ्र्याची गुणवत्ता शोधली जाते. व त्यातील 30 विद्याथ्र्याना एमपीएससी, युपीएससी परिक्षेसाठी सर्व तयारीकरीता पाठविले जाते. त्याचा सर्व खर्च फाऊंडेशन उचलते. गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला यश आले आहे.फाऊंडेशनतर्फे सर्व द:याखो:यातील धडपडणा:या विद्याथ्र्यासाठी खास मार्गदर्शन मेळावेही घेतले जाते. त्यासाठी डॉ.राजेंद्र भारूड, डॉ.योगेश भरसळ, अजय खर्डे हे मार्गदर्शनासाठी येतात. यावर्षी देखील येत्या 16 सप्टेंबरला असामेळावा होणार असून त्याला मार्गदर्शनासाठी आतार्पयत सर्वात कमी वयात आएएस झालेले दिल्ली येथील अन्सार शेख येणार आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी यश संपादन केले आहे.या फाऊंडेशनला मजबूत करण्यासाठी आदिवासी समाजातून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक पाठबळही मिळत आहे. एका माजी अधिका:याने आपल्या मुलीच्या लगAात देणगी जाहीर केल्यानंतर लन्नसमारंभातूनही देणगी देण्याची प्रथा सुरू झाली. काही लोक आपल्या घरच्या कुठल्याही कार्यात बचत करून देणगी देतात. काही वाढदिवसाच्या निमित्ताने काही आपल्या पुर्वजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या फाऊंडेशनला देणगी देवून आर्थिक मदत करीत आहेत. या देणगी रुपातून जवळपास नऊ लाखाच्या आसपास निधी मिळाला असल्याची माहिती या संस्थेचे विश्वस्त ङोलसिंग पावरा यांनी दिली.