लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे़ यातही केवळ जिल्हा बँकेच्या सर्वच शेतकºयाच्या आधार अपडेशन झाले असून राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांची नावे दर दिवशी जोडली जात असल्याने कर्जमुक्तीची प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत़१४ राष्ट्रीयकृत बँका आणि एक सहकारी बँकांनी २०१५ ते २०१९ या कालखंडात अल्पमुदत पीककर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले होते़ आठ जानेवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता असल्याने पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी ९ जानेवारी रोजी प्रकाशित झाली होती़ यातही जिल्हा बँकेने १४ हजार शेतकºयांच्या याद्या देत बाजी मारली होती़ तर १४ राष्ट्रीयकृत बँकांनी साडेचार हजार शेतकºयांचे आधार अपडेट नसल्याचे सांगत तशा याद्या बँकांबाहेर लावल्या होत्या़ परंतू यातून नेमके कर्जासाठी पात्र लाभार्थी किती याची माहिती समोर दिली नव्हती़ दरम्यान नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार सर्व १४ राष्ट्रीयकृत बँकांनी १७ हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र स्पष्ट केले आहे़ परंतू बँकांच्या या आकडेवारीत येत्या ३१ जानेवारीपर्यंत बदल होणार असल्याने शेतकºयांची अंतिम आकडेवारी समजलेली नाही़ परिणामी राज्य शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड होण्यास विलंब होणार असून यामुळे पुढचा टप्पा लांबणार असल्याची चर्चा सुरु आहे़दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेत कर्जमुक्ती योजनेंसंंदर्भात शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले सरकार केंद्र चालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले़ या कार्यशाळेमुळे योजनेला येत्या आठवड्यापासून गती येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयकृत बँकांकडून १७ हजार ५१ शेतकºयांनी २०१५ ते २०१९ या काळात कर्ज घेतल्याने त्यांच्या याद्या अंतीम करण्यात आल्या आहेत़ यातील १५ हजार ९९८ शेतकºयांचे आधार अपडेट असून १ हजार ७३ शेतकºयांच्या आधार अपडेशनची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती बँकांनी दिली आहे़ शेतकºयांच्या या याद्या तयार असल्याने त्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक असले तरी ३१ जानेवारीपर्यंत यात वाढ होणार असल्याचे सर्वच बँकानी सांगितले आहे़ बँकांच्या वरीष्ठ कार्यालयांकडून दरदिवशी शेतकºयांची नावे जोडण्याची प्रक्रिया होत असल्याची माहिती असून ३१ जानेवारी रोजी अंतिम आकडेवारी दिली जाईल असे सांगण्यात आले आहे़युनियन बँकेचे १ हजार ७३, देना बँक २५८, बँक आॅफ इंडिया ४३६, आयडीबीआय ३२९, बँक आॅफ बरोडा २ हजार ९२७, बँक आॅफ महाराष्ट्र २ हजार ९७२, कॅनरा बँक २९०, आयसीआयसीआय ४४, एचडीएफसी ३३, महाराष्ट्र ग्रामीण बँक २६७, अॅक्सीस बँक ३४, पंजाब नॅशनल बँक २४२, एसबीआय ४ हजार ४५६ तर सेंट्रल बँकेचे ३ हजार ५९० लाभार्थी शेतकरी तूर्तास कर्जमुक्तीला पात्र आहेत़जिल्हा बँकेचे एकूण १४ हजार ३१३ शेतकरी पात्र ठरणार असल्याचे अंतिम झाले आहे़ ३१ जानेवारीनंतर सर्व बँकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती अपलोड होणार आहे़ यानंतर शासनाकडून बँकांना कर्जमुक्त शेतकºयांच्या याद्या पाठवून कारवाईला प्रारंभ होणार आहे़ या सर्व प्रक्रियेला महिन्याचा कालावधी लागणार असून मार्च महिन्यापासून शेतकºयांच्या कर्जमुक्तीला सुरुवात होणार आहे़
३० हजार शेतकरी कर्जमुक्तीसाठी ‘अपडेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:10 PM