अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत मालपाडा येथे जनावरांचे लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी गावातील मंदिर चौकात जनावरांचे लंपी स्किन डिसीज लसीकरण व औषधोपचार करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे जंतनाशक औषधेही शेतकऱ्यांना देण्यात आली. या शिबिरासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. वीरेंद्र सोनकुसळे, पशुविस्तार अधिकारी डॉ. प्रताप पावरा, डॉ. अविनाश वळवी, डाॅ. दिलवरसिंग वसावे, प्रशांत चौधरी उपस्थित होते. या शिबिरासाठी मालपाडा येथील जलसिंग पाडवी, बन्सीलाल पाडवी, गिरीश पाडवी, सुरूपसिंग पाडवी, गुमानसिंग तडवी, दाजला पाडवी यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, दुर्गम भागातील भगदरी गावातही पशू लसीकरण शिबिर घेण्यात आले. गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात येऊन पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. अक्कलकुवा तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे लसीकरण पूर्ण केले. या शिबिरासाठी भगदरी येथील चंद्रसिंग पाडवी, उत्तम पाडवी, सुरेंद्र पाडवी, मंगलसिंग पाडवी, गुलाबसिंग वसावे, मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी यांनी परिश्रम घेतले.