भूषण रामराजे । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : तालुक्यातील ठाणेपाडा येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभाग यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हावासियांना वनपर्यटन करण्याची सोय उपलब्ध होणार आह़े गेल्या पाच वर्षापूर्वी देण्यात आलेल्या प्रस्तावांतर्गत विविध कामे पूर्णत्वास आली असून येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होण्याची चिन्हे आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या दक्षिणेला ठाणेपाडा 1 आणि वासदरा मध्यम प्रकल्पाच्या जलसाठा क्षेत्राला गृहीत धरून राबवण्यात येणा:या या योजनेसाठी वनविभागाने आतार्पयत 55 लाख रूपयांचा खर्च केला असून या विविध साहित्याची खरेदी करण्यात आली आह़े हा प्रकल्प ठाणेपाडा संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून राबवण्यात येत आह़े वन समितीद्वारे राबवण्यात येणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प आह़े 1 हजार 200 हेक्टर वनक्षेत्रात जिल्हावासियांना वनपर्यटनाची संधी मिळणार आह़ेवनविभागाकडून आजघडीस वासदरा प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आह़े याठिकाणी येत्या पावसाळ्यात जलसाठा झाल्यानंतर बोटींग सुरू होणार आह़े या कामासाठी तब्बल 26 लाख रूपयांना मंजूरी देण्यात आली होती़ याअंतर्गत 6 लाखांच्या बोटी मागवण्यात आल्या आहेत़ त्यासोबत वनक्षेत्रात जलक्षेत्रात वॉटर सायकलींगसह इतर अनेक साधने मागवण्यात येणार आह़े यासोबत लाईफ ज्ॉकेट आणि बोटीवर चढण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने रॅम्प तयार करून घेतला आह़े वनपर्यटनात पक्षीनिरीक्षणाचा आनंदही नागरिक येथे घेऊ शकणार आहेत़ पाणवठय़ाच्या परिसरात तब्बल 16 हजार चिमण्या आणि इतर पक्ष्यांची नैसर्गिक घरटी वनतज्ञांच्या मार्गदर्शनाने तयार होणार आहेत़ यातून पक्ष्यांचे संवर्धन होणार असल्याची अपेक्षा वनविभागाने व्यक्त केली आह़े बोटींगसोबतच 18 हेक्टरक्षेत्रावर चिल्ड्रेन पार्क तयार करण्याची तयारी वनविभाग करत आहेत़ यासाठी 5 लाख रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात खर्च होणार आह़े पार्कमध्ये विविध वृक्ष लागवडीची कामेही सध्या हाती घेण्यात आली आहेत़ बालोद्यानात येणा:या बालकांना वनक्षेत्रात सायकलींग करता येणार आह़े वनपर्यटन ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी वनविभागाने वासदरा वनक्षेत्रातील गट क्रमांक 138/139 या 20 हेक्टर जमिनीवर 11 लाख रूपये खर्चून बांबू वनाची लागवड केली आह़े 6 बाय 6 अशी बांबू रोपांची येथे लागवड करण्यात आली असून यात 1 लाखांपेक्षा अधिक बांबू रोपांचे संवर्धन करण्यास सुरूवात झाली आह़े या बांबू वनाच्या माध्यमातून पर्यावरण बचावचा संदेश देण्यासह वनविभाग बांबूचे विविध फायदे सांगणारे कायमस्वरूपी संग्रहालयही याठिकाणी तयार करणार असून यासाठीचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे देण्यात आला आह़े वनपर्यटनाचा एक भाग म्हणून कॅकटस गार्डन आणि बोटॅनिकल गार्डनची निर्मिती ठाणेपाडा रोपवाटिकेत करण्यात येणार आह़े यासाठी दोन लाख 79 हजार रूपयांचा निधी देण्यात आला आह़े परंतू हा निधी अपूर्ण पडत असल्याने पुन्हा नव्याने समितीकडून वनविभागाला निधीचा प्रस्ताव देण्यात येणार आह़े या वनपर्यटन प्रकल्पांर्त्गत बापदर या वनक्षेत्रातून वाहणा:या नाल्याचे पुनरूज्जीवन करण्यात येत असून वनव्यवस्थापन समितीने या खोलीकरण आणि पुनर्भरणाचे काम हाती घेतले आह़े यामुळे या भागात जलसिंचन होणार आह़े
वनक्षेत्रात साकारणार वनपर्यटन प्रकल्प : नंदुरबार वनक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:47 PM