लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तळोदा तहसील कार्यालयावर सकाळी 11 वाजता बसस्थानकापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चेक:यांच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात डिङोल, पेट्रोल दरवाढ रद्द करण्यासह, महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तुंचे भाव नियंत्रणात आणण्यात यावेत, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांतर्गत गरजू कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात यावे, घरकुलाची थकीत रक्कम लाभाथ्र्याना अदा करण्यात यावी, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनांतर्गत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार दरमहा दोन हजार रुपये पेन्शन लाभाथ्र्याना अदा करण्यात यावे, तसेच प्रलंबीत प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावेत, आदिवासी वनाधिकार कायद्याप्रमाणे 7/12 उतारे देवून खेडुतांच्या नावाने जमिनी कराव्यात तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या प्रतापपूर ते तुळाजा रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी यासह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.या वेळी मोर्चेक:यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांशी चर्चा केली. तसेच तहसीलदार चंद्रे यांनी त्यांच्या स्तरावरील मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे आश्वासन दिले.मोर्चाचे नेतृत्व माकपाचे तालुकाध्यक्ष मंगलसिंग चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्या इंदिराबाई चव्हाण, रूबाबसिंग ठाकरे, तुळशीराम ठाकरे, नथ्थू साळवे, अनिल ठाकरे, दयानंद चव्हाण, लक्ष्मण ठाकरे, रमण पवार आदींनी केले.या वेळी माकप कार्यकत्र्यानी उपस्थित मोर्चेक:यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी फौजदार चंद्रकांत शिंदे, यादव भदाणे व त्यांच्या सहका:यांसोबत चोख बंदोबस्त ठेवला.
विविध मागण्यांसाठी माकपतर्फे तळोद्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:34 PM