नंदुरबार : आरोग्य विभागाने गेल्या वर्षात कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी राबवलेल्या शिबिरांमध्ये पुरुषांचाही सहभाग राहिला असून धडगाव तालुक्यातून सर्वाधिक पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करुन घेतल्या आहेत़ जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील 58 प्राथमिक आरोग्य आणि 290 उपकेंद्रात वर्षभर कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत महिला आणि पुरुषांसाठी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया घेण्यात येतात़ 2018-19 या वर्षाकरिता जिल्ह्याला एकूण 7 हजार 90 शस्त्रक्रियांचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यानुसार सर्व सहा तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये शस्त्रक्रिया शिबिरे भरवण्यात आली होती़ यातून 2 हजार 574 शस्त्रक्रिया शिबीरे पूर्ण करण्यात आल्याची माहिती आह़े दर महिन्याला किमान 700 र्पयत शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात आला होता़ यात डिसेंबर 2018 र्पयत प्रत्येक तालुक्यात शिबिरे होऊन 1 हजार 151 महिलांवर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या़ यात महिलांच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया ह्या शहादा तर सर्वाधिक कमी शस्त्रक्रिया ह्या धडगाव तालुक्यात झाल्या होत्या़ महिलांच्या शस्त्रक्रियेत पिछाडीवर असलेल्या धडगाव तालुक्याने मात्र पुरुषांच्या शस्त्रक्रियेत आघाडी घेत जिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांना मागे टाकले आह़े तालुक्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डिसेंबर 2018 र्पयत 339 पुरुषांनी नसबंदी करुन घेतली आह़े सर्व 13 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या शिबिरांमध्ये पुरुषांनी या शस्त्रक्रिया करुन घेतल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार जिल्ह्याला यंदा 7 हजार 90 महिलांवर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यात नंदुरबार 1 हजार 370, नवापूर 1 हजार 267, शहादा 1 हजार 900, तळोदा 613 तर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील 970 महिलांच्या शस्त्रक्रिया करण्याचे निर्धारित करण्यात आले होत़े यानुसार वर्षभरात नंदुरबार 307, नवापूर 145, शहादा 387, तळोदा 212, अक्कलकुवा 100 अशा 1 हजार 51 महिलांवर शस्त्रक्रिया झाल्या़ विशेष धडगाव तालुक्यात अद्यापर्पयत एकाही महिलेने शस्त्रक्रिया केलेली नाही़ डिसेंबर 2018 मध्ये नंदुरबार 63, नवापूर 81, शहादा 94, तळोदा 36 तर अक्कलकुवा तालुक्यात 100 महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ शस्त्रक्रियांची वार्षिक टक्केवारी ही केवळ 23 टक्केच आह़े पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांना शहरी भागात सहसा नकार दिला जातो़ परंतू ग्रामीण भागातही हा नकार वाढत आह़े यातून गेल्या वर्षात नंदुरबार 5, नवापूर 6 तर शहादा तालुक्यात केवळ 5 पुरुष नसबदींसाठी तयार झाले होत़े दुसरीकडे तळोदा 48, अक्कलकुवा 90 आणि धडगाव तालुक्यात 339 जणांनी नसबंदी करुन घेतली आह़े धडगाव तालुक्यात शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असताना अद्याप 27 जणांनी आरोग्य केंद्रांमध्ये नोंदणी केल्याची माहिती आह़े अद्याप त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत़ सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक गावे असलेल्या नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तालुक्यातील पुरुषांमध्ये याबाबत मात्र उदासिनता आह़े
पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेत धडगाव तालुका आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:48 PM