शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

आवक घटल्याने भाजीपाला दरात झाली मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 8:23 PM

नंदुरबार : वाढते तापमान, पाण्याची कमतरता व दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबारात भाजीपाला आवक घटली असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ त्यामुळे ...

नंदुरबार : वाढते तापमान, पाण्याची कमतरता व दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबारात भाजीपाला आवक घटली असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच भाजीपाला दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे दिसून येत आहे़नंदुरबारातील पश्चिम पट्टयातून भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते़ त्यासोबतच बाहेरुन येत असलेल्या भाजीपाल्याचीही आवक मंदावली असल्याने साहजिकच भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे़ सुरुवातीला साक्री तसेच महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांकडून बाजार समितीत भाजीपाल्याची आवक करण्यात येत होती़ परंतु वाढत्या तापमानामुळे ती आवकही मंदावली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे अनेक पोकळा, गवारसारख्या भाज्यांची आवक अत्यंत मंदावली असल्याचे दिसून येत आहे़गेल्या आठवड्यात जिल्ह्यात तापमानाचा पारा साधारणत: ४२ अंशापर्यंत गेला होता़ त्याआधीदेखील तापमान चाळीशीच्या जवळपासच होते़ त्यामुळे भाजीपाला पिकांचे यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे़गेल्या वर्षी केवळ ६७ टक्के इतकाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ निर्माण झालेला आहे़ यात पाण्याअभावी भाजीपाला पिक तग धरु न शकल्याने साहजिकच पिक जळून भाजीपाला उत्पादक शेतकºयांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते़-----------------प्रकाश आंबेडकर यांची २३ रोजी नंदुरबारात सभानंदुरबार : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ सुशिल अंतुर्लीकर यांच्या प्रचारार्थ भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची २३ एप्रिल रोजी नंदूरबार मध्ये सभा होणार आहे.भारिप बहुजन महासंघाचे महासचिव डॉ. प्रकाश शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीला भारिपचे औरंगाबाद विद्वत्त सभेचे डॉ.किशोर वाघ, प्रा. भगवान गव्हाळे, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. सुशील अंतुर्लीकर, डॉ. देविदास शेंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नियोजनासंबंधी चर्चा करण्यात आली.