रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी व प्रतापपूर भागात यंदाही टरबूज लागवडीला सुरुवात झाली आह़े यंदा पाण्याची स्थिती गंभीर असतानाही शेतकरी आर्थिक उत्पन्नाच्या आशेने टरबूज लागवड करत आहेत़यंदा दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर तळोदा तालुक्यात टरबूज लागवडीच्या क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता होती़ परंतू खरीपातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी टरबूज हा चांगला पर्याय असल्याचे लक्षात शेतक:यांनी कामांना सुरुवात केली आह़े यात शेतक:यांना वातावरणाची साथ मिळत असून उष्ण आणि कोरडय़ा हवामानात सुरुवातीच्या काळात लागवड केलेल्या बियाण्याला फायदा होत असल्याची माहिती देण्यात आली आह़े रांझणी व प्रतापपूर भागात जागोजागी टरबूज लागवड करणारे मजूर तसेच शेतशिवारात माल्चिंग पेपर अंथरल्याचे दिसून येत आह़े शेतक:यांकडून अध्र्या एकरी अर्धा किलो बियाण्याचा वापर करण्यात येत आह़े यंदा टरबूजाचे दर चांगले राहण्याची शक्यता असल्याने शेतक:यांकडून लागवडीसाठी खर्च करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आह़े साधारण 100 ते 120 दिवसात येणा:या टरबूजासाठी काही शेतक:यांनी ठिबकचा तर काही शेतकरी पारंपरिक चारी पद्धतीने पाणी देणार असल्याचे शेतीकामांवरुन स्पष्ट झाले आह़े
तळोदा तालुक्यात टरबूज लागवडीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:49 PM