लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील भोंगरे गावात खुलेआमपणे हातभट्टीची दारू निर्मिती करून ती विक्री करणा:यांकडे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक धाडसत्र सुरू केले. या कारवाईत एक हजार 350 लीटर महूफुलांचा वॉश, टय़ुबमध्ये असलेली 250 लीटर दारूसह सुमारे 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील भोंगरे गावात गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करून खुलेआम विक्री केली जात होती. या अवैध दारू विक्रीमुळे पिणारे व विक्रेत्यांमध्ये अनेकवेळा भांडणतंटे निर्माण झाले. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. या प्रकाराला ग्रामस्थही वैतागले होते. अखेर गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव करून दारूची विक्री करणा:यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची काही महिने अंमलजावणी झाली. मात्र काहींनी छुप्या पद्धतीने दारु विक्री सुरू केली. याबाबत पोलिसांकडेही तक्रारी देण्यात आल्या होत्या.पोलिसांच्या धाडीअखेर शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, हे.कॉ.धनराज जाधव, राहुल बोराडे, राजेंद्र गावीत, दादाभाई बुवा, बलविंदर ईशी, करणसिंग वळवी, अरुण चव्हाण, महिला पोलीस कल्पना पाटील यांच्या पथकाने सापळा रचून भोंगरे गावात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हातभट्टीच्या दारू अड्डय़ांवर धाडी घातल्या. त्यात ईश्वर गियान पावरा (24) याच्याकडे नऊ हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्यात 400 लीटर महुफुलांचा वॉश, दोन प्लॅस्टीक ड्रम, 1200 रुपये किमतीचे वेगळे दोन ड्रम व इतर साहित्य तर दुस:या धाडीत रामदास पंडित पावरा (28) याच्याकडे 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 500 लीटर महुफुलांचा वॉश, छोटे-मोठे सहा प्लॅस्टीकचे ड्रम, तिस:या धाडीत प्रीतम शिवाजी पावरा (30) याच्याकडे 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 450 लीटर महूफुलांचा वॉश, लहान-मोठे सहा ड्रम, मोटारीच्या टय़ुबमध्ये भरलेली 250 लीटर दारू असा माल ताब्यात घेण्यात आला. या गुन्ह्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण चव्हाण, बलविंदर ईशी, करणसिंग चव्हाण यांनी शहादा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीसांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतले आह़े या कारवाईमुळे भोंगरे गाव व परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करून ती विक्री करणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहादा तालुक्यातील भोंगरे गावात दारू अड्डय़ांवर धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:19 PM