लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मतदार संघाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन शहादा मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी केले.विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे लोकमंच हा कार्यक्रम शहादा-तळोदा विधानसभा कार्यक्षेत्रातील जीवननगर पुनर्वसन वसाहतीत घेण्यात आला. यावेळी सरदार सरोवर विस्थापित मणिबेली पासून भादल र्पयतच्या सर्व 33 गावातील मुख्य प्रतिनिधी, 11 पुनर्वसन वसाहतींचे जवळपास हजार ते दीड हजार आदिवासी सहभागी झाले होते. लोकमंचाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेश पाडवी यांचे प्रतिनिधी दाज्या पावरा, काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वत: पद्माकर वळवी, अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा तसेच गावगावचे मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. प्रास्ताविकात चेतन साळवे यांनी आयोजनाची माहिती दिली. त्यांनतर जेलसिंग पावरा, दाज्या पावरा व पद्माकर वळवी यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. त्यानंतर उपस्थित लोकांनी गावगावातले मुख्य प्रश्न विचारले. लतिका राजपूत यांनी समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळपूर पुनर्वसनचे माँ नर्मदा युवक मंडळाचे अध्यक्ष गुलाबसिंग पावरा यांनी केले. ओरसिंग पटले, कृष्णा पावरा, पुन्या वसावे, ओरसिंग पटले, चेतन साळवे, यमुना पावरा, नुरजी पाडवी, नाथ्या पावरा, वेस्ता पावरा, खेमसिंग पावरा सियाराम पाडवी आदींनी संयोजन केले.
उपस्थितांनी उमेदवार व प्रतिनिधींना विविध प्रश्न विचारले. उमेदवारांनी देखील आपल्या पद्धतीने या प्रश्नांना उत्तरे दिली. आश्वासन देतांना कार्यवाही संदर्भात देखील उपस्थितांना आश्वासीत केले. लोकसभा निवडणुकीत देखील अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.