लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जिल्ह्यातील चारही जागा या काँग्रेसला सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीला जागा न सुटल्याने नाराज होऊन जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला. जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षात जाण्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, गेल्या निवडणुकीत आघाडी नसतांना राष्ट्रवादीने चारही जागा लढविल्या होत्या. पैकी नवापूर, अक्कलकुवा मतदारसंघात दुस:या तर शहादा मतदारसंघात तिस:या स्थानावर राष्ट्रवादीचे उमेदवार होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. जिल्ह्यातील चारही जागा या काँग्रेसला सुटतील हे देखील स्पष्ट झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या पाश्र्वभुमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी शहादा येथे कार्यकत्र्याचा मेळावा घेत मते जाणून घेतली. शहादा येथील तैलीक मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाकडून आपणांस दिलेले आश्वासन न पाळले गेल्याने आपण राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णयाप्रत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र गावित म्हणाले, शहादा- तळोदा मतदार संघ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे राहिल असे आश्वासन पक्षाने आपणास दिले होते. त्यानुसार गेल्या पाच वषार्पासुन आपण या मतदार संघात मेहनत घेतली. परंतु आता हा मतदार संघ काँग्रेसकडे गेल्याने आपली फसवणुक झाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने दिलेले आश्वासन न पाळल्याने आपण सर्व कार्यकत्र्यांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याचे गावित यांनी जाहीर केले. या निवडणुकीत शहादा- तळोदा मतदार संघासाठी जो पक्ष आपल्यास उमेदवारी देईल त्या पक्षात प्रवेश करु असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. गेल्याच महिन्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला होता त्यापाठोपाठ आता गावित यांच्या सोडचिठ्ठीने राष्ट्रवादीला देखील मोठा धक्का बसला आहे. राजेंद्र गावित यांनी कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट न केल्याने आता ते कोणत्या पक्षात जातात व निवडणूक लढविणार का याकडे त्यांच्या कार्यकत्र्यांचे लक्ष लागले आहे.मेळाव्यास पंचायत समितीचे माजी सभापती डॉ सुरेश नाईक, दरबारसिंग पवार, वांगीबाई पावरा, पंचायत समिती सदस्य आनण सोनवणे, विनोद मोरे, बाबुराव पवार, गणेश पाटील, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, सुरेंद्र कुंवर, राजु कोळी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा मतदार संघातून काँग्रेसचे चारजण इच्छूक आहेत. नवापूर मतदारसंघात आमदार सुरुपसिंग नाईक यांच्या ऐवजी यावेळी त्यांचे पूत्र आणि आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. अक्कलकुवा मतदार संघातून विद्यमान आमदार अॅड.के.सी.पाडवी हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. शहादा मतदार संघात माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तर नंदुरबार मतदारसंघात गेल्या वेळी पराभूत झालेले व माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे व डॉ.राजेश वळवी यांनी उमेदवारी मागणी केली आहे.