लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणुकीत अनुचित प्रकार उद्भवू नये आणि निवडणुका शांततेत व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातील विधानभा मतदारसंघ क्षेत्रातील शस्त्र परवानाधारक यांच्याकडील शस्त्रे बाळगण्यावर र्निबध घातले असून शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश दिले आहेत.विशिष्ट परवानाधारकांच्या बाबतीत त्यांची गरज तपासून ठराविक कालमर्यादेसाठी परवानाधारकांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितल्यास त्यांच्या अर्जानुसार वेगळ्या बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील र्निबध आपोआप रद्द होतील व जमा केलेली शस्त्रे परवनाधारकांना मतमोजणीच्या एका आठवडय़ानंतर परत करण्यात येतील. राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस कर्मचा:यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अवैध शस्त्रांचा वापर टाळण्याच्यादृष्टीने पोलीस विभागाने कारवाई करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Vidhan Sabha 2019 : शस्त्र परवानाधारकांवर शस्त्रे बाळगण्यावर र्निबध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:36 PM