लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सदस्य नोंदणीतून पुढील 15 ते 20 वर्षासाठी भाजपची पायाभरणी करण्याचा संकल्प आहे. या नोंदणीद्वारे सर्वसामान्य लोकांर्पयत पक्षाचे विचार पोहचविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले.नंदुरबारातील दिनदयाल चौकात डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी होते. जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, उत्तर महाराष्ट्र नोंदणी अभियान प्रमुख डॉ.शशिकांत वाणी, जि.प.सदस्य जयपाल रावल, अॅड.उमा चौधरी, प्रकाश चौधरी, सविता जयस्वाल, संगिता सोनवणे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री रावल म्हणाले, मोहिम ग्रामिण व शहरी भागात मोठय़ा प्रमाणावर राबविण्याचा भाजपचा मानस आहे. या नोंदणीद्वारे सर्वसामान्य लोकांर्पयत भाजपचे विचार पोहचविण्याचा प्रय} आहे. यातून प्रत्येक सदस्याला पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती मिळणार आहे. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यात सुमारे तीन लाखावर सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. या नोंदणीतून भाजपचे सक्रीय सदस्य नोंदणी होऊन पक्षाचे विचार घराघरार्पयत पोहचविण्यात येणार आहे. सूत्रसंचलन प्रकाश चौधरी यांनी केले. यावेळी नगरसेवक चारूदत्त कळवणकर, निलेश माळी, नरेंद्र माळी, माणिक माळी, कल्पना पंडय़ा, डॉॅ.सपना अग्रवाल, मिलींद मोहिते आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांर्पयत पक्षाचे विचार पोहचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:36 PM