लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभेच्यानंदुरबार मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत हे 69 हजार 870 मतांनी विजयी झाले आहेत़ त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्घी उमेदवार उदेसिंग पाडवी यांचा पराभव केला़ 25 व्या फेरीअखेर आमदार डॉ़ गावीत यांना 1 लाख 20 हजार 825 मते प्राप्त झाली होती़ तर काँग्रेसचे उदेसिंग पाडवी यांना 50 हजार 955 मते मिळाली़ नंदुरबार मतदारसंघातून एकूण 6 उमेदवार रिंगणात होत़े यात खरी लढत ही भाजपाचे पाच वेळा विजयी झालेले आमदार डॉ़ विजयकुमार गावीत आणि शहादा-तळोदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच भाजपाकडून तिकीट नाकारलेले उदेसिंग पाडवी यांच्यात लढत होती़ उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली़ मतदारसंघात तिस:या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या दिपा सॅमसन वळवी आहेत़ त्यांना 6 हजार 683 मते मिळाली आहेत़ बसपाचे विपुल वसावे यांना 1 हजार 921, स्वाभीमानीचे अॅड़ प्रकाश मोहन गांगुर्डे यांना 1 हजार 437 तर अपक्ष उमेदवार आनंदा सुकलाल कोळी यांना 2 हजार 40 मते मिळाली़ मतदारसंघातून 3 हजार 497 मतदान हे नोटाला गेले आहेत़
निवडणूक निकाल 2019 : नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावीत यांचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:43 PM