लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील सांडपाण्याच्या गाव तलावामुळे चटके देणा:या उन्हाळ्यातसुध्दा ग्रामस्थ सुखावत असल्याचे चित्र दिसून येत आह़े ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे त्यांना उन्हाळ्यात या तलावाचा आधार मिळत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागाला नेहमीच कोरडय़ा दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असतात़ त्यामुळे मार्च, एप्रिल व मे महिना पाण्याविना काढणे येथील ग्रामस्थांना मोठे अवघड जात असत़े वाढत्या तापमानामुळे येथील सर्व जलस्त्रोत कोरडे होत असतात़ मोजक्या विहिरी, कुपनलिका तसेच हातपंप यातूनही पाणी मिळवणे कठीण होत असत़े त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येथील ग्रामस्थांना उन्हाचे चटके सहन करत पाण्यासाठी वणवण करावी लागत असत़े त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत काही वर्षापूर्वी गावातील सांडपाण्याची साठवणुक करण्याचे ठरवल़े त्यानुसार गावाच्या बाहेर खोलीकरण करुन गावाचे सांडपाणी बाधण्यात आलेल्या तलावाच्या दिशेने वळवल़े त्याच सोबत या गाव तलावाच्या लगत गुरांना पाणी पिण्यासाठी तसेच धुण, भांडी करण्यासाठी लागणारे पाण्याचे हौदसुध्दा तेथेच बांधल़े जेणेकरुन हे पाण्याचे हौद ‘ऑव्हर फ्लो’ झाल्यास ते पाणीसुध्दा गाव तलावात जावून मिळत असत़े त्यामुळे ग्रामस्थांना उन्हाळ्यात निर्माण होणा:या पाणी टंचाईची झळ सोसने काही प्रमाणात सोपे जात आह़े मत्स्यपालनाला वावया गाव तलावात मत्स्यपालनालासुध्दा वाव आह़े किंबहुणा यातून मोठय़ा रोजगाराचीसुध्दा निर्मिती होऊ शकत़े बहुतेक ग्रामस्थांकडून यात मत्स्य बीज टाकण्यात येत असत़े त्यानंतर ते मासे मोठे झाल्यावर मासेमारी करण्यात येत असत़े त्यामुळे याची व्याप्ती वाढविल्यास यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे तलावातील पाणी काहीसे कमी होत असले तरी, अद्याप तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे कधी घडले नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना या गाव तलावाचा मोठा आसरा जाणवतो़
बारमाही गाव तलावाने सुखावताय समशेरपूर येथील ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:46 PM