लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, सीतानगर, शिक्षक कॉलनी परिसर आदी गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र भावना उमटताना दिसून येत आहेत़ संबंधित परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत़ उन्हाची तीव्रता वाढत असून उकाडय़ानेही ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा होत नसल्याने विजेवर चालणारे यंत्र बंद असल्याने ग्रामस्थांचे कुलर, पंखे बंद आहेत़ त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव इतरत्र गारव्याचे ठिकाण शोधावे लागत आहे व तेथेच दुपारची वेळ घालवावी लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़ेदरम्यान, अक्कलकुवा ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपूर्वीच या भागातील ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केली होती़ मात्र तीन दिवसांपासून विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने संबंधित परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आह़े यामुळे येथील रहिवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊन पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आह़े दिवसागणिक तापमानात वाढ होत आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच होरपळून निघत आहेत़ त्यातच महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ जेरीस आले आहेत़ दुपारच्या वेळी पंखे तसेच कुलरशिवाय घरात राहणे कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे आबालवृद्धांना या त्रासाचा सामना करावा लागत आह़े परिसरात दुपारच्या वेळी झाडांखाली येथील रहिवासी बसलेले दिसून येत असतात़ काहींकडून खाट टाकून येथेच झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली आह़े दुपारच्या वेळी हवादेखील नसल्याने ग्रामस्थ होरपळून निघत आहेत़ याशिवाय दैनंदिन गरजेपुरते लागणारे पाणीही मिळत नसल्याने अखेर सरपंच उषाबाई बोहरा तसेच उपसरपंच मक्राणी व विश्वास मराठे यांच्याकडून जनरेटरच्या साहाय्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आह़े
कृत्रिम पाणीटंचाईने ग्रामस्थ बेहाल : अक्कलकुवा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:01 PM