लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील मोठे कडवान येथील २३८ शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यापासून वंचित आहेत़ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत येथील दुकानात स्वस्त धान्याचा अल्प पुरवठा करण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे़ याबाबत ग्राम दक्षता समितीने तहसीलदार यांच्याकडे धान्याची मागणी केली़मोठे कडवान येथील स्वस्त धान्य दुकानास नवापूर येथील पुरवठा विभागाकडून कमी प्रमाणात धान्य पुरवठा करण्यात आला आहे़ यामुळे एप्रिल महिन्यासाठी निम्म्यापेक्षाही कमी प्रमाणात धान्यपुरवठा आहे़ यातून तांदूळ २ हजार १५० किलो, गहू १ हजार ५०० किलो व साखर फक्त ३० किलो पुरवण्यात आली़ येथील रेशन दुकानात ३८५ शिधापत्रिकाधारक आहेत़ कमी प्रमाणात धान्य उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित धान्य मिळावे यासाठी गावाचे सरपंच बंधू पाच्या वळवी व रेशन दुकानदार आऱएम़ वळवी यांनी पुरवठा विभागात विचारणा केली असता त्यांनी तसा अर्ज करण्यास सांगितले. मात्र पुरवठा विभागात धान्य मिळण्याबाबत अर्ज करून देखील धान्य मिळालेले नाही़गावातील ४८५ पैकी १४७ लाभार्थींनाच धान्य मिळाले असून २३८ लाभार्थींना नियमित धान्य मिळाले नाही. वारंवार नवापूर पुरवठा विभागात मागणी करून देखील धान्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मोठे कडवान येथील ग्रामस्थांनी कैफियत मांडण्यासाठी सरपंच तथा ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष बंधु गावीत यांच्याकडे आपले गाºहाणे मांडून धान्य देण्याची मागणी केली़प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एकूण १ हजार ४०७ लाभार्थी आहेत़ त्यांना ७ हजार ३५ किलो धान्य पुरवणे अपेक्षित असताना पुरवठा विभागाकडून फक्त ५ हजार ६०० किलो धान्य पुरवले आहे. दक्षता समितीने निदर्शनास आणून दिल्याने उर्वरित १ हजार ४२५ किलो धान्य मंगळवारी पुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते़ परंतू कारवाई झालेली नाही़
ग्रामस्थांना धान्य मिळाले नसल्याने त्यांनी तहसील प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती़ दरम्यान धान्य वाटप करण्यासाठी आलेले मंडळ अधिकारी बी.एन. सोनवणे यांचे वाहन ग्रामस्थांनी रस्त्यात अडवत त्यांना परत पाठवले होते़ पूर्ण धान्य दिल्याशिवावाय गावात एकही शासकीय वाहनाला प्रवेश देणार नाहीत असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे़