लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा:या सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत पाडय़ांवरील हातपंपांची पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंप बंद पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगरावरील चढ-उताराच्या रस्त्यावरुन भटकंती करीत नदी-नाल्यातील ङिा:यातून पाणी आणावे लागत आहे. सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरीवलपाडा, फाखालपाडा, पाटीलपाडा, मौलीखेडीपाडा, माथाआंबापाडा, आमलीपाडा, डोसपाडा या पाडय़ांवरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपाची सोय करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पातळी खोल गेल्याने हातपंप आटले आहेत. काही हातपंप जेमतेम सुरू आहे. पाण्याच्या शोधासाठी या पाडय़ांवरील ग्रामस्थांना डोंगरावरील चढ-उताराच्या रस्त्यावरून एक ते दीड किलोमीटरची पायपीट करून नदी-नाल्यातील ङिा:यातून पाणी आणावे लागत आहे. या पाडय़ांवर पाण्याच्या सोयीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक विहिरी खोदाव्यात व हातपंप 400 ते 500 फुटार्पयत करावेत, अशी मागणी होत आहे.
सल्लीबारच्या पाडय़ांमधील ग्रामस्थ पाणीटंचाईने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:39 PM