शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

बिबटय़ांनी झाडावर मुक्काम ठोकल्याने ग्रामस्थांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : कळमसरे ता़ तळोदा शिवारातील शेतात वडाच्या झाडावर नर व मादी बिबटय़ाने दोन दिवस मुक्काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : कळमसरे ता़ तळोदा शिवारातील शेतात वडाच्या झाडावर नर व मादी बिबटय़ाने दोन दिवस मुक्काम केल्याने शेतकरी व ग्रामस्थांची एकच पळापळ झाली़ बिबटय़ाच्या मुक्कामामुळे कळमसरे, मोहिदे आणि मोड या गावातील शेतक:यांनी दोन रात्री जागून काढल्या़         रविवारी दुपारी मोड येथील शेतकरी पुरुषोत्तम चौधरी यांच्या कळमसरे शिवारातील शेतात गेलेल्या मजूरांना बिबटय़ा दिसून आला होता़ यावेळी मजूरांनी मोड गावाकडे येत माहिती दिली होती़ शेतकरी चौधरी यांच्यासह मोड, मोहिदे आणि कळमसरे येथील ग्रामस्थांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, बिबटय़ाच्या पावलांच्या ठसे दिसून आल़े दरम्यान शेतकरी परत आले होत़े रात्री काही शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता, चौधरी यांच्या कळमसरे गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील वडाच्या झाडावर दोघे बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसून आल़े ही माहिती कळमसरे गावात पोहोचल्यानंतर त्यांची धावपळ सुरु झाली़  यातून रविवार आणि सोमवार अशा दोन रात्री कळमसरे आणि मोहिदे गावातील नागरिकांनी जागून काढत गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढय़ांच्या रक्षणासाठी खडा पहारा दिला़ दरम्यान मंगळवारी दुपारी तळोदा येथील वनविभागाच्या पथकाने याठिकाणी भेट देत पाहणी केली होती़ नर आणि मादी बिबटय़ा असल्याचा अंदाज वर्तवत वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याबाबत अनुकुलता दर्शवली आह़े नुकतीच मध्यप्रदेशातील खेतिया परिसरात महिलेला बिबटय़ाने ठार केल्याची घटना घडली आह़े यातच कळमसरे शिवारात दोन बिबटे आढळून आल्याने ग्रामस्थ व शेतक:यांमधून भिती व्यक्त होत आह़े 

कळमसरे गावापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील झाडावर बिबटे  बसून असल्याने गावातील 37 घरांमधील प्रत्येकाने दोन रात्री जागून काढल्या़ गावातील अनेकांनी रविवारीच वनविभागाला संपर्क केल्याची माहिती आह़े परंतू पहाटेपासून बिबटे नाहिसे झाले होत़े सोमवारी सायंकाळी पुन्हा ते झाडावर जाऊन बसले होत़े रात्री उशिरा ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी पथक पाठवले होत़े पथकाने मंगळवारी सकाळी तपासणी केली असता, बिबटे तेथून उत्तर दिशेने पुढे निघून गेल्याचे दिसून आल़े  दरम्यान दोघा बिबटय़ांचा शोध घेण्यासाठी तळोदा वनविभागाचे उपवनसंरक्षक एकनाथ चौधरी यांनी वनक्षेत्रपाल निलेश रोडे, एऩजी़पाटील, अशोक पाटील, एल़टी़पावरा, आऱजी़शिरसाठ, श्रावण कुवर यांचे पथक नियुक्त केल्याची माहिती दिली आह़े 

तळोदा तालुक्यात बिबटय़ांनी केलेल्या हल्ल्याच्या घटना लक्षात घेता प्रशासनाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आह़े ऊसाच्या शेतात बिबटय़ांचा संचार वाढण्याचे संकेत मिळू लागल्याने ऊस उत्पादक चिंतेत असून वनविभागाने यंदा ठोस उपाय करण्याची मागणी आह़े