लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून जादा बसेस देण्यात आल्या आहेत़ नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा व नवापूर आगाराकडून सोमवारपासून दिवाळीसाठीच्या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़दिवाळी, पाडवा तसेच भाऊबीज आदी सण लक्षात घेता एसटी महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े अक्कलकुवा आगारअक्कलकुवा आगाराकडून अक्कलकुवा-पुणे अशा दोन शेडय़ुल व्यतिरिक्त जादा दोन बस सोडण्यात येणार आह़े या बसेस दुपारी दोन वाजता असणार आह़े त्याच प्रमाणे अक्कलकुवा-वाशिम सकाळी साडेपाच तसेच अक्कलकुवा-कल्याण सकाळी साडेसहा वाजता राहणार आह़े त्याच प्रमाणे दुपारी दोन वाजता अक्कलकुवा-नाशिक (कुकुरमुंडा मार्गे) ही बस सकाळी सहा, नऊ तर दुपारी बारा व तीन वाजता असणार आह़े या आधी अक्कलकुवा-नाशिक बसफेरी प्रकाशामार्गे होत होती़ परंतु दिवाळीनिमित्त यात बदल करुन आता ती कुकुरमुंडामार्गे सोडण्यात येणार आह़े शहादा आगारशहादा आगाराकडून सोमवारपासून दहा जादा बसेस सोडण्यात येणार आह़े त्यात, शहादा-परळी सकाळी सहा, शहादा-मुंबई सकाळी सात, शहादा-पुणे सकाळी अकरा, शहादा-रावेर सकाळी नऊ, शहादा-नाशिक सकाळी सव्वा नऊ तसेच सकाळी दहा, दुपारी दीड, शहादा-सूरत सकाळी साडेसात, शहादा-वापी सकाळी साडेआठ, शहादा-पुणे दुपारी साडेपाच वाजता असणार आह़े नवापूर आगारनवापूर आगाराकडून नवापूर-चोपडा सकाळी सहा, नवापूर-पूणे सकाळी साडेसात, नवापूर-औरंगाबाद सकाळी साडेआठ, नवापूर नाशिक, सकाळी दहा तर नवापूर-चोपडा सकाळी साडेआठ वाजता असणार आह़े नंदुरबार आगारनंदुरबार आगाराकडून मात्र दिवाळीसाठी इतर आगारांच्या तुलणेत कमी बसेस सोडण्यात येत आह़े नंदुरबार-अहमदाबाद, नंदुरबार-नाशिक दोन फे:या, नंदुरबार-उदना दोन फे:या असे नियोजन करण्यात आले आह़े दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रत्येक आगाराला त्यांच्या प्रस्तावानुसार जादा बसेस देण्यात येत असता़ खाजगी वाहतुकीच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाकडून नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत़ प्रवाशांनी सुरक्षित वाहतुकीसाठी जास्तीत जास्त एसटीचा प्रवास करावा असे आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आह़े दरम्यान, एसटी महामंडळाकडून बसेस वाढविण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या लक्षात घेता बसेसच्या संख्येत अजून वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े दिवाळीचा सण असल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करीत असतात़ परंतु त्या तुलणेत बसेसची संख्या नसत़े त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असता़ अनेकांना उभच राहुन प्रवास करावा लागत असतो़ त्यामुळे बसफे:यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आह़े तसेच लांबपल्यांच्या रातराणी बसेसचीही संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आल़े
दिवाळीसाठी जादा बसेसची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:44 PM