लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जैन समाजाच्या पयरुषण पर्वास प्रारंभ झाला़ यानिमित्त बुधवारी शहरातून कल्पसूत्र ग्रंथाची वरघोडा मिरवणूक काढण्यात आली़ सवाद्य काढलेल्या मिरवणूकीत समाजबांधव सहभागी झाले होत़े सकाळी 11 वाजता दादावाडी येथील जैन मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला होता़ तत्पूर्वी प.पु.तपस्वी पुण्यर}सुरीस्वर म.सा. व प.पु यशोर}ासुरीस्वरजी म.सा, साध्वी ललितातांगरेखाश्रीजी यांनी प्रवचन दिले. यात त्यांनी पर्यूषण पर्वाचे महत्त्व सांगितल़े मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर व्हावे यासाठी पयरुषण काळात प्रार्थना करण्यात येत असते. उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, तप, त्याग, आकिंचन्य, ब्रrाचर्य या दशलक्षण धर्माची साधना केली जाते. जीवन परिपूर्ण होण्यासाठी सर्वांनी दशलक्षण धर्माचे पालन करणे काळाची गरज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े दादावाडीपासून काढलेली मिरवणूक गिरीविहार मार्गाने भवरलाल बागरेचा यांच्या निवासस्थानार्पयत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, उद्योगपती देवेंद्र जैन, माजी नगरसेवक पुखराज जैन, मदनलाल जैन यांच्यासह शहरासह जिल्ह्यातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े सायंकाळी भजनसंध्या आणि धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम झाला़ संयोजन भवरलाल बागरेचा, जितेंद्रकुमार बागरेचा, संतोषकुमार बागरेचा यांनी केले.पर्यूषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े
पर्यूषण पर्वानिमित्त शहरात वरघोडा शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:22 PM