लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत येथील जी.टी. पाटील महाविद्यालय येथे मतदार जागृती मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. साडेसात हजार विद्याथ्र्यानी मानवी साखळीद्वारे विधानसभा निवडणुकीचा लोगो तयार करीत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. यावेळी निवडणूक निरीक्षक रंजन कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प संचालक अविनाश पांडा, वसुमती पंत, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित होते.गुरुवारी सकाळपासून जी.टी. पाटील महाविद्यालयाचा परिसर विद्याथ्र्यानी फुलला होता. विद्याथ्र्यानी शिस्तीचे प्रदर्शन घडवीत मानवी साखळी तयार केली. मानवी साखळीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचा संदेश देण्यात आला. विद्याथ्र्यानी यावेळी ‘वोट फॉर नंदुरबार’ अशा घोषणा दिल्या. उपक्रमासाठी परिश्रम घेणा:या क्रीडा शिक्षकांचा या वेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मतदान करण्याची व मतदानासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याची संकल्प शपथ घेण्यात आली. मानवी साखळीत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व आशा सेविकांनी सहभाग घेतला.
महोत्सवाप्रमाणे मतदानात सहभाग घ्या -रंजन कुमार निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून नागरिकांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी उत्साहाने मतदानात सहभाग घ्यावा व इतरांना मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन रंजन कुमार यांनी या वेळी केले. ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’ कार्यक्रम सुरू केला आहे. मतदाराचे शिक्षण व त्याला मतदानासाठी प्रोत्साहीत करणे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे मतदानाचे महत्व मतदारांर्पयत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी डॉ.भारूड म्हणाले की, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होत युवकांनी मतदानाचा हक्क बजवावा व इतर विद्याथ्र्यानी परिसरातील पाच कुटुंबांना मतदानासाठी प्रेरित करावे. शालेय विद्याथ्र्यानी आपल्या पालकांना मतदानाचे आवाहन करावे. सर्वानी एकत्रित प्रय} केल्यास लोकसभा निवडणूक मतदानाच्या टक्केवारीत दुस:या क्रमांकावर असलेला नंदुरबार जिल्हा विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.