लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ऐकुण ८७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पैकी २२ ग्रामपंचायती बनविरोध झाल्या असून एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. ६३ ग्रामपंचायतींच्या २१५ जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून त्यासाठी तयारी पुर्ण करण्यात आली आहे. गुरुवारी मतदान कर्मचारी साहित्यासह रवाना झाले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात निवडणूक रंगत आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी नेत्यांनीही लक्ष घातले आहे. यंदा बिनविरोध निवडणूक करण्याकडे मोठा कल दिसून आला. त्यामुळे कधी नव्हे ते प्रथमच एकाच वेळी २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये काही गावे ही मोठे व राजकीय दृष्ट्या संवेदनशील देखील आहेत.
पोलीस बंदोबस्तनिवडणूक होणाऱ्या ६३ ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर दोन पोलीस कर्मचारी तसेच काही ठिकाणी होमगार्ड यांनाही तैणात करण्यात आले आहे. निवडणूक कर्मचारी यांच्यासोबतच नियुक्त पोलीस कर्मचारी देखील रवाना झाले आहेत. याशिवाय अधिकारी तालुकास्तावर राहतील. पोलिसांचे गस्ती वाहने देखील तालुकास्तरावर राहणार आहेत.
ऐनवेळी झाली निवडणूक रद्द... खोंडामळी येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच शिल्लक राहिले होते. परंतु अर्ज दाखल करण्याच्या आधी या गावात सरपंच व ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी बोली लागल्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याने आयोगाने या गावाची निवडणूक रद्द केली असून नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
संवेदनशील गावेसारंगखेडा, तोरखेडा, असलोद, मोहिदेतर्फे शहादा, भालेर, कोपर्ली, उमराण, पळशी, नर्मदानगर, काकर्दा, चुलवड, घाटली, धनाजे बुद्रूक यासह इतर गावांमधील काही बूथ ही संवेदनशील आहेत. तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षताकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. बाधीत आणि क्वॅारंटाईन मतदारांसाठी वेगळी व्यवस्था राहणार आहे. मतदान केंद्रात रांगा लावतांना देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,तसे आयोगाने निर्देश आहेत.
मतमोजणी होणार सोमवारीमतदान शुक्रवारी होणार असले तरी मतमोजणी मात्र सोमवार, १८ रोजी त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहे. त्यादृष्टीनेही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
तालुकानिहाय ग्रामपंचायतीनंदुरबार ०६शहादा २१अक्कलकुवा ०१तळोदा ०७नवापूर १२धडगाव १६एकुण ६४
अशी आहे निवडणूक
ग्रामपंचायत संख्या ६३
एकूण प्रभाग संख्या २१५
रिंगणातील उमेदवार १,२२९
महिला उमेदवार ६३२
एकूण मतदान केंद्र २१५
अधिकारी संख्या २०
कर्मचारी संख्या १,०७५