नाशिक विभागातील स्थिती : पालकांमध्ये नाराजीनंदुरबार : शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा उघडून तीन आठवडे झाले तरी अद्याप वह्यांचा पुरवठा झालेला नसल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे आणखी किती दिवस लागतील याबाबत संभ्रम कायम आहे.आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी आयुक्तालयास्तरावरून पुस्तके व वह्यांसह शालेय साहित्याचा पुरवठा केला जातो. यावर्षी देखील ती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक विभागातील आश्रमशाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटप करण्यात आली. त्याचवेळी वह्या देखील वाटप करणे अपेक्षीत होते. परंतू दरवर्षाप्रमाणे यंदाही वह्या व शालेयसाहित्य देण्यात दिरंगाई होत आहे. शाळा उघडून तीन आठवडे उलटले तरी अद्यापही आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप झालेल्या नाहीत. वह्या वाटप करण्यासाठी आयुक्तालय स्तरावरून निविदा काढली जाते. यंदा देखील काढली गेली. परंतू दरकरारात एकमत न झाल्याने आधी काढलेली निविदा रद्द करण्यात आली. आता दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे त्या प्रक्रियेला आणखी किती दिवस लागतील व प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या हाती कधी वह्या मिळतील याकडे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही लक्ष लागून आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांची प्रतिक्षा
By admin | Published: July 06, 2016 6:17 PM