शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कुशल कामगारांना मजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रोजगार हमी योजनेंतर्गत तळोदा व धडगाव तालुक्यातील लाभार्थ्यांनी गुरांचे गोठे व सिंचन विहिरीची कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रोजगार हमी योजनेंतर्गत तळोदा व धडगाव तालुक्यातील लाभार्थ्यांनी गुरांचे गोठे व सिंचन विहिरीची कामे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पूर्ण केली आहेत. रोहयोतून सदर लाभार्र्थींना कुशल कामगारांची मजुरी दिली जाते. परंतु अजूनही संबंधितांना ही मजुरी दिली गेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.शासनाच्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा तीन प्रकारात संबंधीत मजुरांना मजुरी दिली जात असते. या योजनेतून शासन इंदिरा आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन विहीर, गुरांचे गोठे अशा वेगवेगळ्या योजनाही राबवित असते. धडगाव-तळोदा तालुक्यात दोन तालुक्यांमध्येही संबंधीत लाभार्थ्यांनी सिंचन विहिरींच्या कामांसोबत गुरांच्या गोठ्यांची कामे केली आहेत. साधारण ९० लाभार्थ्यांनी या योजनेतून ही कामे केली आहेत. शिवाय त्यांनीही कामे पूर्ण करून जवळपास पाच ते सहा महिने झाली आहेत. तरीही त्यांना आपल्या कुशल कामगाराची मजुरी अजून पावेतो मिळालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या कुशल कामगााची मजुरी मिळण्यासाठी हे लाभार्थी सातत्याने संबंधीत यंत्रणेकडे थेटे घालत आहेत. यात ग्रामीण खेड्यांमधून शहरातील कार्यालयात येण्यासाठी खिशातील पदरमोड करावा लागत आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसादेखील वाया जात आहे. परंतु या उपरांतही त्यांच्या पदरी निराशा येत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे. कधी आॅनलाईन प्रक्रिया चालू आहे तर कधी वरूनच पैसे आले नसल्याची बतावणी केली जात असल्याचे हे लाभार्थी सांगतात. इकडे रोहयोतून तत्काळ पैसे मिळतील या आशेपोटी संबंधीत लाभार्थ्यांनी उधार-उसनवारीतून पैसे घेऊन युद्धपातळीवर कामे पूर्ण केली आहेत. आता उधार-उसनवारीचे पैसे मागण्यासाठी संबंधीत व्यक्ती सतत तगादा लावत असल्याची त्यांची व्यथा आहे. अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीत कुठून पैसे आणावेत अशा विवंचनेत हे लाभार्थी पडले आहेत. यातील ९० टक्के लाभार्थी धडगाव तालुक्यातील आहेत. या सर्वांनी रोहयोतून सिंचन विहिरींचीच कामे घेतली आहेत. एकीकडे शासन महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करीत असते. आताच चार दिवसांपूर्वी घर तेथे गुरांचा गोठादेखील योजना सुरू केली आहे. असे असताना दुसरीकडे कुशल, अर्धकुशल, कामगाांना मजुरी देण्याबाबत सातत्याने उदासिन धोरण घेत असते. त्याचबरोबर अकुशल कामगारांना तातडीने लगेच मजुरीही उपलब्ध करून दिली जात असते. शासनाच्या अशा दुजाभावाच्या धोरणामुळे लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुशल, अर्धकुशल कामगारांच्या मजुरीबाबत निधी देण्याबाबत शासन नेहमीच उदासिन धोरण घेत असल्याने कुणीही लाभार्थी लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे. कारण तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या आदिवासी तालुक्यांना दिलेले उद्दिष्ट्येदेखील पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. तळोदा तालुक्यात तर केवळ पाचच शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. अशा वस्तुस्थितीमुळे योजनेचा उद्देश सुद्धा सफल होत नाही.लाभार्थ्यांच्या रखडलल्या अनुदानाबाबत संबंधीत यंत्रणांना विचारले असता लाभार्थ्यांनी काम पूर्ण केले आहे. त्याची पाहणीही केली आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यामधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत. तेथून रोजगार हमी योजनेच्या नागपूर येथील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. परंतु निधी वरिष्ठ स्तरावरूनच उपलब्ध झालेला नाही. झाल्यानंतर तातडीने लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतून कुशल कामगारांच्या मजुरीपोटी नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडून आलेल्या अशा प्रस्तावांसाठी नागपूर येथील योजनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे साधारण तीन कोटी रूपयांची मागणी गेल्या चार महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे. यासाठी संबंधीतांकडून सातत्याने पाठपुरावादेखील सुरू आहे. कदाचित लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे निधी प्रलंबीत असू शकतात, असेही सांगितले जात आहे. इतर जिल्ह्यात हा निधी वितरीत झाला आहे. त्यामुळे इकडेही लवकरच मिळण्याचा आशावाद संबंधीतांनी व्यक्त केला आहे.