लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात कुपनलिकांमध्ये कमी पाण्याच्या कुपनलिकांमध्ये जल पुनर्भरण प्रयोग राबविण्यात येत आह़े त्यामुळे अल्पावधीतच जिल्ह्यातील 140 कुपनलिकांमध्ये जलसंधारणाच्या पॅटर्नने भूजल पातळीत वाढ करण्यात आली आह़े बंद कुपनलिकांना पुनर्जीवित करण्याचे काम यातून करण्यात आले आह़े प्रतिष्ठानने राबविलेल्या कार्यक्रमात गेल्या वर्षी या काळा दहा मिनीटेही न चालणा:या कुपनलिकांची निवड करण्यात आली होती़ त्या सध्या पाऊण तास चालत असल्याचा दावा प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आह़े प्रतिष्ठानच्या सदस्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्याकडून हे काम पूर्णपणे मोफत करण्यात ये आह़े या कामासाठी लागणा:या साहित्यांचा खर्च केवळ संबंधितांकडून करण्यात येत आह़े नंदुरबार शहरात प्रतिष्ठानने 140 ठिकाणी पूर्णपणे बंद तसेच कमी पाणी असलेल्या कुपनलिकांवर हे काम करण्यात आले आह़े
नंदुरबारातील 140 कुपनलिकांवर जल पुनर्भरण प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:45 PM