दुधखेडा धरणातील पाण्याचे नियोजन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:26 AM
पूर्ण क्षमतेने जलसाठा : लाभ न मिळाल्यास शेतक:यांचा आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील दुधखेडा धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेचा जलसाठा असून त्या पाण्याचा फायदा जास्तीत जास्त शेतक:यांच्या शेतीसाठी कसा होईल यासाठी संबंधित विभागाने नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, यंदा रब्बी हंगामासाठी या धरणातील पाण्याचा शेतक:यांना लाभ मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.असलोद येथून तीन किलोमीटर अंतरावर दुधखेडा धरण आहे. या धरणावर 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या धरणाच्या पाण्याचा उपयोग असलोद, दुधखेडा, मंदाणे, न्यू असलोद येथील शेतक:यांना रब्बी हंगामात होतो. परंतु गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या कारणांमुळे कोरडवाहू शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी धरणाच्या दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन पाणी वाया जात असे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, शेतक:यांच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पाणी शेतार्पयत पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या पाटचा:या पूर्णत: दुरूस्ती करण्याची गरज आहे. शेतीला बागायत करून उत्पन्न वाढविण्यासाठी धरणातील पाण्याचे योग्य गरजेनुसार नियोजन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जबाबदारी स्वीकारून संबंधित पाटबंधारे विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी या धरणाच्या पाण्यावर दामळदा रस्त्यालगतच्या शेतार्पयत पाणी मिळून शेती बागायत होत होती. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून धरणावर आधारीत बागायत सिंचन क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. पाणी ठराविक अंतरार्पयत पोहोचत असल्याने प्रशासनाने वेगवेगळ्या समस्यांची दखल घेत जास्त शेतक:यांर्पयत पाणी पोहोचविण्याची गरज आहे. धरणाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पाटचा:या दुरूस्ती व साफसफाई करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणीचे निवेदन संबंधित विभागाला शेतक:यांनी दिले आहे. यावर्षी याबाबत नियोजन न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असून पाटबंधारे विभागाने धरणात असलेल्या पाण्याचा उपयोग शेतक:यांना करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.