लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : जिल्ह्यातील 37 लघु प्रकल्पांपैकी 25 प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पांपैकी विरचकमध्ये 30 टक्के तर रंगावली प्रकल्पात 44 टक्केर्पयत पाणीसाठा राहिला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा चढता राहत असल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रियेत वाढ झाल्याने देखील पाणी साठय़ावर परिणाम झाला आहे. दरम्यान, विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी देखील खोल गेली असून उन्हाळी कापूस लागवडीवर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्केर्पयत पाऊस झाला होता. परंतु अनियमित स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे त्याचा पाणीसाठा होण्यास काहीही उपयोग झाला नाही. नदी, नाले देखील जास्तकाळ प्रवाही होऊ शकले नाहीत. केवळ पिकांसाठी पावसारी सरासरी सहाय्यभूत ठरली. पाणीसाठाच होऊ शकला नसल्यामुळे यंदा मार्च अखेरच जिल्ह्यातील निम्मेपेक्षा अधीक प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला आहे.रब्बीवर परिणामजिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाअभावी रब्बी पिकावर देखील त्याचा परिणाम दिसून आला. हरभरा, गहू पिकांना पाण्याचे आवर्तने न मिळाल्याने त्यांच्या उत्पादनावर काहीसा परिणाम दिसून आला. जिल्ह्यात उन्हाळी पीक घेण्याचे प्रमाण फारसे नाही. ज्या आठ, दहा टक्क्यांवर उन्हाळी पीक घेतले जाते ते देखील यंदा पाण्याअभावी घेतले गेले नसल्याची स्थिती आहे.25 प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील जवळपास 25 प्रकल्प आजच्या स्थितीत कोरडेठाक पडले आहेत. कोरडे पडलेल्या व केवळ दहा टक्केच्या आत अर्थात मृत साठा शिल्लक असलेल्या पाणी प्रकल्पांमध्ये खापरखेडा, कोंढावळ, लंगडी भवानी, लोंढरे, शहाणे, गढावली, रोझवा, सिंगसपूर, उमराणी, हळदाणी, खेकडा, नावली, सोनखडकी, कोकणीपाडा, पावला, शनिमांडळ, वावद, खडकी, खोकसा, मेंदीपाडा, मुगधन, रायंगण, सुलीपाडा, विसरवाडी, आंबेबारा, धनीबारा, खोलघर, शिरवाडे, ठाणेपाडा, वासदरा, वसलाय या प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यम प्रकल्पमध्यम प्रकल्पांमध्ये रंगावलीत 44 टक्के, विरचकमध्ये 30 टक्के, राणीपूरमध्ये 35 तर दरा प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय सारंगखेडा बॅरेजमध्ये 35 टक्के तर प्रकाशा बॅरेजमध्ये 89.18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी विरचक प्रकल्पातील सद्य स्थितीत सर्वच पाणीसाठा हा नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आला आहे.उशाला पाणी, घशाला कोरडसारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये पाणी असूनही त्याचा काहीही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात ते सर्व पाणी सोडून द्यावे लागणार आहे. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात नुसतेच अडवून ठेवलेले पाणी अशी स्थिती असून या भागातील नागरिकांच्या उशाला पाणी आहे, मात्र घशाला कोरड कायम असल्याची स्थिती दिसून येत आहे. उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीची कामे संथ गतीने सुरू आहेत. तापी-बुराई उपसा योजनेच्या कामाला गती नाही. त्यामुळे हे पाणी उपसाही करता येत नसल्याचे चित्र आहे.उन्हाळी कापूस लागवडप्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने जमिनीत देखील पाणी मुरण्याची प्रक्रिया झाली नाही. परिणामी बागायतदार शेतक:यांच्या विहिरी आणि कुपनलिकाच्या पाण्याची पातळी देखील खोल गेली आहे. त्यामुळे उन्हाळी पीक तर घेतले गेले नाहीच आता मे महिन्यात होणारी कापूस लागवड देखील यंदा कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जवळपास 11 ते 14 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कापूस लागवड केली जाते. यंदा पाणीच नसल्यामुळे दोन किंवा तीन हजार हेक्टरवरच उन्हाळी कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतक:यांना जूनमध्येच कापूस लागवड करावी लागण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 25 प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:42 PM