लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : तळोदा तालुक्यातील भवर येथे गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आह़े त्यामुळे येथील ग्रामस्थांवर डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आह़े याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़ेगेल्या काही दिवसांपासून येथे पाणीपुरवठय़ात बिघाड झाल्याने पाण्याची समस्या भेडसावत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी लगतच्या गावात 10 किमीर्पयत पायपीट करावी लागत आह़े सध्या उन्हाळा सुरु झाला असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर टंचाई जाणवू लागली आह़े मजुरांना आपला रोजगार बुडवून पाण्याचा शोध घ्यावा लागत आह़े पाणीटंचाईमुळे त्यांना आर्थिक फटकादेखील सहन करावा लागत आह़े पाण्याची कमतरता असल्याने त्यांना पिक जगविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती आह़े अनेक ठिकाणी कुपनलिका बंद पडल्या आहेत़ अजून उन्हाळ्याची तीन महिने शिल्लक असताना मार्च महिन्यातच जलस्त्रोत आटत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसर्पयत गेला आह़े त्यामुळे येत्या काळात उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने सोसाव्या लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े भवर येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत संपूर्ण गावासाठी पाण्याची सोय व्हावी या करीता जलकुंभ बांधण्यात आले होत़े मात्र या जलकुंभात पाणी चढविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने यातही ठणठणाट असल्याची स्थिती आह़े अनेक वेळा जनावरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसत़े त्यामुळे पशुपालकांसमोर समस्या निर्माण होत असत़े दरम्यान, या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून पर्यायी व्यवस्था म्हणून हातपंपावर सौर उज्रेव्दारे चालणारे मोटरपंप बसविण्यात आले आह़े परंतु तेही गेल्या काही दिवसांपासून बंद पडले असल्याचे दिसून येत आह़े गावातील महिलांना घरची तसेच शेतीची कामे सोडून पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े
भवर येथील ग्रामस्थ सोसताहेत पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:31 AM