शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई

By admin | Published: March 27, 2017 12:14 AM

अक्कलकुवा तालुक्यात समस्या : नाल्यातील झºयातील पाण्याचा आधार

वाण्याविहीर : सातपुड्याच्या दुर्गम भागातील वडफळी, कुकडीपादर व हुणाखांब या तीन ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या पाड्यांवर पाणी टंचाई तीव्र झाली आहे़ या तीव्रतेत पाड्यांवर टाकलेले नादुरुस्त हातपंप  अधिक भर टाकत आहेत़ बंद पडलेल्या हातपपांमुळे चापडी येथे काही दिवसांपूर्वी आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी पाणीच न मिळाल्याने तीन घरे भस्मसात झाली होती़    अक्कलकुवा तालुका प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येऊनही कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गम भागातून वाहणारे नदी व नाल्याचे पाणी आटल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ चापडी गावासह पाड्यांवर ठिकठिकाणी नादुरुस्त झालेल्या हातपंपांची दुरुस्ती करून पाणीटंचाईतून सुटका करण्याची मागणी करूनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़  अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागातील कुकडीपादर, वडफळी व हुणाखांब या तीन ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गठाणीपाडा, म्हेलेंटेबापाडा, तुरवीराहीपाडा, वड पाडा, अरेठी, अरेठीचा तुरविहीपाडा, निंबीपाडा, बोरखापाडा, केवडी, गालीसिबाडीपाडा, बाराआंबापाडा, गामाईपाडा, देवचापडापाडा, रमणपाडा, केवडापाडा, सरपंचपाडा, चावडी, वावीपाडा, माथापाडा, एकलापाडा, वडफळी, होळीदेवपाडा, रुबजीपाडा, गोलापाडा, खाळपाडा, खमळपाडा, बगदा, जांबीपाडा, हनुमानमंदिर पाडा, पांढरामाती, पुंजारापाडा, महाराजपाडा, माजी सरपंचपाडा, मोरही, उमराईपाडा, मोरही गाव, मोवान, शेल्टीपाडा, काजीआंबापाडा, मोकस, सोगाआंबापाडा, पुवरापाडा, तडवीपाडा, हुणाखांब, खाटीआंबापाडा, डोंगºयापाडा, चनवाईपाडा, लोहारपाडा याठिकाणी पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे़ नदी नाले पूर्णपणे कोरडे झाल्याने महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागात नाल्यांंमध्ये केलेल्या शेवड्या आणि झºयांमधून पाणी आणत आहेत़ हे झरे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वेळ लागत असल्याने उन्हातान्हात महिला त्याठिकाणी बसून रहात असल्याचे दिसून येत आहे़ यापूर्वीही गेल्या महिन्यात या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही़पाणीटंचाईग्रस्त पाड्यांची संख्या वाढतच जाणार असल्याने             तालुका प्रशासनाने पाड्यांवर हातपंप दुरुस्तीचे पथक पाठवण्याची मागणी आहे़ यासोबत नव्याने हातपंपांची निर्मिती करण्यासाठी सर्वेक्षण यंत्रणा राबवण्याची गरज असल्याचे मत दुर्गम भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे़