लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरात रिमझीम पाऊस सुरु झाला असूनही पाण्याची गंभीर परिस्थिती सुटता सुटत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. दरम्यान शहरात एकदिवसा आड पाणी दिले जात आहे.शहरातील सराफ गल्लीतील मोटार जळाल्याने बोअरिंग आठ दिवसापासून बंद पडली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना टँकर मागवून पाणी घेण्याची वेळ आठ दिवसापासून येत आहे. सराफ गल्लीतील त्रस्त रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेत जाऊन पाणीपुरवठा अभियंता सचिन अग्रवाल यांना विनंती करुनदेखील बोअरिंग मोटार दुरुस्त झाली नाही. मोटार दुरुस्ती न झाल्याने पाणी मिळत नसल्याने सराफ गल्लीतील त्रस्त व संतप्त महिला आणि पुरुष नगरपालिकेत गेले असता नगरपालिकेच्या कार्यालयीन अधिक्षकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात महिला व पुरुषांना बसण्यासाठी मज्जाव केला. ते म्हणाले की, माङया दालनात फक्त दोन लोकांनीच यायचे बाकी बाहेर थांबा असे सांगून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप सराफ गल्लीतील रहिवाशांनी केला आहे. संतप्त महिला व पुरुष कार्यालय अधिक्षकांच्या दालनासमोर जमिनीवर खाली बसले. जो र्पयत आमच्या सराफ गल्लीतील बोअरिंगची मोटार दुरुस्त होत नाही तोर्पयत आम्ही येथून उठनार नाही असा पवित्रा रहिवाशांनी घेतला.पाणीपुरवठा अभियंता सचिन अग्रवाल यांनी तातडीने बोरवेलची मोटार दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. पालिकेच्या नियोजनशुन्य काराभारामुळे नवापूर शहरात पाण्याच्या पाण्याची भीषणता निर्माण झाली आहे. नागरीक त्यांच्या समस्या घेऊन गेल्यास त्यांना पालिकेचे अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात हे बरोबर नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिका:यांनी अशा अधिकारींना समज देऊन त्यांची इतर विभागात बदली करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सराफ गल्लीतील रहिवाशांनी मोटार दुरुस्तीसाठी पालिकेत जाऊन समस्या मांडल्या. पालिकेचे कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे व वारवांर समस्या सांगून ही कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी ठासून सांगितल्यावर आश्वासन दिल्या प्रमाणे दुपारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी मोटार दुरुस्ती करत होते. सराफ गल्लीत बोरींग दुरुस्ती होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. नगर पालिकेतील कार्यालयीन अधिक्षकांनी सराफ गल्लीतील महिला व पुरुषांना अपमानास्पद वागणूक दिल्या बद्दल रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करुन नाराजी व्यक्त केली. याबाबत पालिकेचे गटनेते गिरिष गावीत यांचाकडे रहिवाशांनी तक्रार केली असून, नगर पालिकेत समस्या घेऊन येणा:या रहिवाशांना पालिकेचे अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात. अशा अधिका:याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
नवापूर शहरात टँकरने पाणीपुरवठा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:11 PM