लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उमटीपासून एक किलोमीटर अंतरावर उमटीचा आठळीपाडा हा 300 लोकवस्तीचा पाडा आहे. या पाडय़ार्पयत जाण्याकरीता रस्ताच नसल्याने रस्त्याअभावी हातपंपची गाडी पोहचू शकत नाही. त्यामुळे या परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध करता येत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गावात एक खाजगी विहीर आहे. मात्र तीदेखील आटली असून, या परिसरातील नदी-नालेही कोरडे ठाक झाल्याचे चित्र आहे. येथील ग्रामस्थांना बाराही महीने पाण्यासाठी भटकंती करीत दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून ङिारा तयार करून पाणी आणावे लागत आहे.आठळीपाडा येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रस्त्याअभावी हातपंपाची गाडी जावू शकत नाही त्यामुळे पाण्याची सोय करता आली नसल्याने तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील नदी-नाले ही कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांनादेखील दीड किलोमीटर अंतरावर पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे उमटीच्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या देवनदीत ङिारा तयार करून तेथून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. येथील जनावरांनाही तयार केलेल्या ङिा:यावर पाणी पिण्यासाठी न्यावे लागत आहे.
उमटी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:59 AM