लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात खालावलेल्या भूजलाचा फटका टरबूज उत्पादकांना बसण्याची शक्यता आह़े विहिरींनी तळ गाठल्याने चार तालुक्यात लागवड होणारे उत्पादन यंदा धोक्यात आह़े जिल्ह्यात साधारण 700 हेक्टर टरबूजाची दरवर्षी लागवड करण्यात येत़ेजिल्ह्यात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी नवनवीन फळ पिकांकडे गेल्या 15 वर्षात आकृष्ट झाल़े यातील प्रमुख उत्पादन म्हणजे टरबूज होय़ पाणी उपलब्ध असलेल्या शहादा आणि तळोदा तालुक्यात 50 एकरावर येणारे टरबूज उत्पादन आता हजार हेक्टर्पयत पोहोचले आह़े दुर्गम भागातील दोन तालुका वगळता, नवापूर, नंदुरबार, शहादा आणि तळोदा या चारही तालुक्यात टरबूजाची शेती केली जात आह़े एकरी 50 हजार ते 1 लाख रूपयांर्पयत खर्च असलेल्या टरबूज शेतीला लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने यंदा लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आह़े जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवडय़ापासून ठिकठिकाणी टरबूज लागवड सुरू असून शेतकरी माल्चिंग पेपर, बियाणे, औषधे यांची खरेदी करून आणत आह़े गेल्यावर्षाच्या तुलनेत पाच ते सात टक्के महाग झालेला माल्चिंग पेपर आणि त्याच तुलनेत महागलेले बियाणे यामुळे काहींनी लागवड क्षेत्र कमी केल्याचे सांगण्यात येत आह़े गेल्या आठवडय़ापासून हवामान खात्याने गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर ब:याच ठिकाणी टरबजू लागवडीची कामे थांबवण्यात आली असल्याने चिंता वाढल्या आहेत़
विहिरींनी तळ गाठल्याने टरबूज धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:52 PM