बदलत्या हवामानाचा नागरिकांना फटका
नंदुरबार : कोरोनापाठोपाठ आता बलदत्या हवामानाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. जिल्ह्यात कधी पाऊस, तर कधी ऊन, अशा संमिश्र वातावरणाचा त्रास नागरिकांना होत आहे. या वातावरणामुळे विविध आजारांचे रुग्ण वाढत असून, खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
धडगाव : काही गावांतील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालनपोषण करताना अडचणी येत आहेत.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
नवापूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध आजारांचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरीच सुरक्षित राहावे व शासनाच्या नियमानचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच जर कोणालाही सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे असतील, तर कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.