लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीचे प्रत्येकी एक चाक चोरटय़ांनी लांबवल्याची घटना रविवारी उघडसीस आली. गाव व परिसरात भुरटय़ा चोरांचा उच्छाद सुरूच असल्याने नागरिक वैतागले आहेत.सविस्तर वृत्त असे की, ब्राrाणपुरी येथील माधव जगन्नाथ पाटील व डिगंबर लिमजी पाटील यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉली त्यांनी आपल्या खळ्यात उभ्या केल्या होत्या. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास माधव पाटील यांचे ट्रॅक्टर चालक आपसिंग पावरा यांना दोन्ही ट्रॉलीचे एक-एक चाक दिसून आले नाही. त्यांनी ट्रॉली मालकांना याबाबत सांगितले. चोरटय़ांनी दोन्ही ट्रॉलीचे एक-एक चाक लंपास केल्याचे निदर्शनास आले. ब्राrाणपुरी परिसरात मोटारसायकलींची चाके चोरीचे सत्र सुरू असताना आता चोरटय़ांची नजर आता शेतीपयोगी यंत्रांच्या चाकांवर पडली आहे. आता शेतक:यांनी आपली शेतीपयोगी वस्तू व यंत्रे कुठे ठेवावीत, असा प्रश्न पडला आहे. परिसरात भुरटय़ा चोरांचा उच्छाद सुरूच असून पोलिसांनी त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
ब्राrाणपुरी येथून ट्रॅक्टर ट्रॉलींची चाके लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:14 PM