नंदुरबार : नंदुरबार शहरात पालिकेकडून बसविण्यात आलेले पाण्याचे एटीएम गेल्या दीड महिन्यांपासून बंद आह़े याबाबत रविवारी मुख्याधिकारी गणेश गिरी यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले होत़े ब:याच दिवसांपासून एटीएम बंद असल्यावरही याबाबत मुख्याधिका:यांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेयाबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठे पाणी फिल्टर करण्याचे मशिन बंद तर कुठे पाण्याची कमतरता असल्याचे समोर आले आह़े कारण काहीही असले तरी, पाण्याचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होताना दिसून येत आह़े गेल्या दीड महिन्यापासून पाण्याचे एटीएम बंद असतानाही पालिका प्रशासनाकडून याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आह़े त्यामुळे मुख्याधिकारी गिरी यांनी याबाबत तातडीने लक्ष घालत पुर्वीप्रमाणे एटीएम कार्यान्वित करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आह़े
कुठे मशिनमध्ये बिघाड तर, कुठे पाण्याची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 1:18 PM