लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गावागावात जावून सव्र्हे करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांनी बैठकीत दिल्या.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. बोडके, महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, सीएससी जिल्हा समन्वयक हमिद पिंजारी व पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांमधील पात्र लाभाथ्र्यांना आयुष्यमान भारत योजनेचे ई-कार्ड उपलब्ध करुन देणे, पोषण योजनेअंतर्गत पात्र लाभाथ्र्यांना योजनेचा लाभ देणे देणे, तसेच बचत गटांमधील सदस्यांना कुटुंबांसाठी आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. भारुड म्हणाले, 16 ऑगस्ट र्पयत सर्व बचत गटांच्या बैठका आयोजित करुन आयुष्यमान भारत योजनेची माहिती देण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला या योजनेचे कार्ड मिळेल असे नियोजन करावे. जिल्ह्यातील एमपीडब्यु यांना कार्ड नोंदणी करण्याचे दर महिन्याचे उद्दिष्ट देण्यात यावे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कार्डमुळे होणारा लाभ, कार्ड तयार करण्याची प्रक्रीया याबाबतची माहिती नोंदणी केंद्रावर लावण्यात यावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात जनजागृतीचे फलक लावावेत. जिल्ह्यात मोठे कार्यक्रम, मेळावे असल्यास त्याठिकाणी कार्ड नोंदणीसाठी शिबीर घेण्यात यावे अशा सुचना त्यांनी दिल्या.
आयुष्यमान भारतसाठी गावांगध्ये सव्र्हे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:40 PM