नंदुरबार : नंदुरबारात गुरुवारी ताशी 16 किमी इतक्या प्रचंड वेगाने वारे वाहिल़े उत्तरेकडे वादळी वा:यांसह होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात वा:यांचा प्रभाव जाणवला़ जळगावात ताशी 24 किमी वेगाने वारे वाहिल़े यात हवेचे ‘डायरेक्शन’ 328 डिग्री इतके होत़े तर हवेचा दाब हा 1 हजार 9 हेक्टापास्कल इतका राहिला़ धुळ्यात ताशी 22 किमी वेगाने वा:यांचा प्रभाव जाणवला़ हवेचे ‘डायरेक्शन’ 277 डिग्री इतके होत़े तर हवेचा दाब 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका होता़ गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात किमान व कमाल तापमानात वाढ झालेली आह़े परंतु दोन ते तीन दिवसांमध्ये थंडीत पुन्हा काही अंशी वाढ होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े उत्तरेकडील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी होत आह़े तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होत असल्याने तेथूनही बाष्पयुक्त वारे वाहत आहेत़ त्यामुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात बदल होत आहेत़ विदर्भ व मराठवाडय़ातही 9 ते 11 फेब्रुवारीर्पयत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आह़े तसेच उर्वरीत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी सांगितल़े तसेच शनिवारपासून थंडीत वाढ होईल असे डॉ़ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आह़े
नंदुरबारात ताशी 16 किमी वेगाने वाहिले वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:16 PM