लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सव्वा लाखाचे थकीत वीजबील कमी करून देण्यासाठी १८ हजारांची लाच स्विकारतांना वीज कंपनीचे वायरमन व सहायक लेखापाल यांना लाच लुचपत प्रतिंबधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगेहातत अटक केली.धनंजय भिका कानडे, वायरमन व जितेंद्र गुलाब ठाकुर, सहायक लेखापाल असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नंदुरबारातील मंगळ बाजारातील दुकानदार यांचे दहा महिन्यांचे एक लाख २५ हजार रुपये वीज बील थकीत होते. ते कमी करून देण्याचे सांगून दुकानदारांकडून दोघांनी २० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १८ हजार रुपये देण्याचे कबुल केले. बुधवारी सायंकाळी मंगळ बाजारातील दुकानाजवळ वायरमन धनंजय कानडे यांनी १८ हजाराची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली. तर जितेंद्र ठाकुर यांना कार्यालयातून अटक करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक शिरिष जाधव, निरीक्षक जयपाल अहिरराव, प्रकाश अहिरे, हवालदार उत्तम महाजन , संजय गुमाणे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे, मनोहर बोरसे, ज्योती पाटील यांनी केली.
१८ हजाराची लाच घेतांना वायरमन व लेखापाल अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 12:56 PM