रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षीच झालेल्या नंदुरबार पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस व शिवसेना युतीच्या ‘नंदुरबार पॅटर्न’ची राजकीय चर्चा महाराष्ट्रात सर्वदूर कौतूकाचा विषय ठरली असताना वर्षभरातच या युतीत नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत़ शनिवारी झालेल्या उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीच्या बैठकीत शिवसेनेचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आह़े नंदुरबार पालिकेची निवडणूक गेल्या वर्षीच झाली़ आमदार शिरीष चौधरी यांचे बंधु डॉ़ रविंद्र चौधरी यांना भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे करण्याचे चित्र निर्माण केले होत़े त्यामुळे काँग्रेसनेही आपले स्थान मजबूत असताना भाजपाचे आव्हान पेलण्यासाठी स्थानिक स्तरावर भाजपाशी नाराज असलेल्या शिवसेनेला जवळ करुन युती केली होती़ या युतीत कॉँग्रेसने शिवसेनेला पाच जागा दिल्या होत्या़ त्यापैकी निवडणूकीत शिवसेनेने चार जागा जिंकल्या तर काँग्रेसने 26 जागा जिंकून एकतर्फी यश मिळवले होत़े पहिल्या वर्षी उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडताना उपनगराध्यक्षपद शिवसेनेला दिले होत़े याशिवाय एक स्विकृत सदस्याची जागाही दिली होती़ त्यामुळे वर्षभर काँग्रेस-शिवसेना युतीत एकमेकांचा चांगला सूर जुळला होता़ दरम्यान वर्षभराच्या काळानंतर शनिवारी उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीसाठी बैठक झाली़ त्यात शिवसेनेचे चारही सदस्य अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आह़े या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ़ विक्रांत मोरे यांनी पालिकेत आपले संख्या बळ कमी असल्याने त्याचा निवडणूकीवर काही परिणाम नसल्याने आपले सदस्य अनुपस्थित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आह़े या प्रतिक्रियेत मात्र अप्रत्यक्ष नाराजीचा सूर व्यक्त होत आह़़े सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेने यावेळी देखील उपनगराध्यक्ष पद मिळावे व 1 स्विकृत सदस्य पदाची जागा मिळावी अशी मागणी केली होती़ मात्र त्यांना काँग्रेसकडून ‘तुमचे संख्याबळ कमी’ असल्याचे उत्तर मिळाल्याने शिवसेनेने अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आह़े याबाबत शिवसेनेच्या एका पदाधिका:याने सांगितले की, युती झाली त्यावेळी काँग्रेसने आपल्याला जेवढय़ा जागा दिल्या तेवढय़ावर आपण समाधान मानले, जर त्याचवेळी जास्त जागांची मागणी केली असती तर आपलेही सदस्य जास्त निवडून आले असते व किमान स्विकृत सदस्याला आवश्यक तेवढे सदस्य निवडून आले असत़े पण आपण काँग्रेसवर विश्वास ठेवला़ राज्यातही अनेक छोटय़ा पक्षांसोबत भाजपाने युती केली होती़ निवडणूकीत ते पराभूत झाले तरी भाजपाने त्यांना विधानपरिषद सदस्य करुन मंत्रीपद दिले आह़े त्यामुळे युती झाल्यानंतर काँग्रेसने सहकारी पक्ष मानून शिवसेनेलाही पालिकेत स्थान देणे आवश्यक असल्याचे सांगितल़े एकूणच उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडी संदर्भात शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली असून वर्षभरातच काँग्रेस व शिवसेना युतीत दुराव्याचे चिन्ह निर्माण झाले आह़े
वर्षभरातच काँग्रेस-शिवसेना युतीत नाराजीचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 1:04 PM