लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्यायालयीन वादातून शहादा बसस्थानकासमोर तिघांनी साक्षीदार माता व तिच्या मुलीला मारहाण केली़ सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रकारादरम्यान तिघांनी महिलेच्या दुचाकीला लाथ मारुन खाली पाडत मारहाण केली होती़लक्ष्मी कांतीलाल पाडवी रा़ विद्यानगरी तळोदा यांच्या आईने लोभाणी ता़ तळोदा येथील गणेश अमरसिंग पाडवी याच्याविरोधात खूनाच्या गुन्ह्यात साक्ष दिली होती़ यासाठी त्या शहादा सत्र न्यायालयात आल्या होत्या़ याचे वाईट वाटल्याने गणेश अमरसिंग पाडवी, इंद्रसिंग जिऱ्या पाडडवी व नटवरसिंग चंद्रसिंग पाडवी रा़ लोभाणी यांनी दोघींचा पाठलाग सुरु केला होता़ बसस्थानकासमोर लक्ष्मी पाडवी ह्या आईसह दुचाकीने जात असताना गणेश पाडवी याने लाथ मारुन दुचाकी खाली पाडली होती़ दोघी पडल्यानंतर तिघांनी पुन्हा मारहाण करत दुखापत केली़ यावेळी दोघींना जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली़ भरचौकात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली होती़याप्रकरणी लक्ष्मी पाडवी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश पाडवी, इंद्रसिंग पाडवी, नटवरसिंग पाडवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक गोसावी करत आहेत़
साक्षीदार महिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:49 PM