लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे सुरु असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड होत आह़े गुरुवारी सकाळी गावातील वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याची घटना घडली़ यात महिला जखमी झाली असून ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य केल्याने वृद्धेचा जीव वाचला़गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बायजाबाई पंडित पाटील स्वयंपाक घरात पाणी गरम करत असताना त्यांच्या अंगावर घराची भिंती कोसळली़ सोबत छताचा पत्राही येऊन पडल्याने त्या दाबल्या गेल्या़ प्रसंगी शेजा:यांनी त्यांचा आवाज ऐकल्याने त्यांनी तातडीने धावपळ करत बचाव कार्य केल़े बायजबाई यांना तातडीने रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े त्याठिकाणी प्राथमिक उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून अद्यापही प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात येत आह़े बायजाबाई ह्या घरात एकटय़ाचा रहात असून त्यांचा मुलगा गावातच रहात असल्याची माहिती आह़े त्यांचा एक मुलगा चार वर्षापूर्वी नदीत पोहोण्यासाठी गेला असता, त्याचा बुडून मृत्यू झाला होता़ आसाणे गावातील योगेश दगड़ू पाटील यांच्या घराची भिंत तर विनोद माणिकलाल पाटील यांचे संपूर्ण घर कोसळल़े आसाणे येथे तलाठी व कोतवाल यांनी पोलीस पाटील दिनेश पाटील, गामपंचायत सदस्य भारत पाटील, किसन पाटील, योगेश पाटील, बन्सीलाल पाटील, समाधान पाटील, पंढरी पाटील, दिनेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामे पूर्ण केल़े
आसाणे येथे भिंत अंगावर पडल्याने महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:05 PM