दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रकाशाकडील पुलाच्या भागात एका महिलेने वरून उडी मारली. वास्तविक त्याठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. काही कळण्याच्या आत महिलेने उडी मारली. त्यामुळे तातडीने पोलिसांनी प्रकाशा येथील पट्टीचे पोहणारे सीताराम महाराज भगत यांना पाचारण केले. त्यांनी बोटीसह एक किलोमीटरचे पात्र पिंजून काढले; परंतु उपयोग झाला नाही. प्रकाशा पोलीस दूर क्षेत्राचे जमादार सुनील पाडवी, पोलीस कॉन्स्टेबल रामा वळवी, विकास शिरसाठ, अजित नागलोद हे तापी नदीचा पुलावर पोहोचले त्यांनीही शोधाशोध केली; परंतु उपयोग झाला नाही. आठ दिवसांत ही दुसरी घटना आहे.
आठ दिवसांपूर्वी देखील एका स्कूटीचालक महिलेने या ठिकाणी उडी घेतली होती. त्या महिलेचाही शोध लागू शकला नाही.