लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : व्यसनाधिनतेमुळे दोन युवकांचा गेलेला बळी आणि गावात वाढलेली भांडणे याला कंटाळून लहान शहादे ता़ नंदुरबार येथील महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून, ठिय्या आंदोलन करून घेतला़ मंजूर करण्यात आलेला हा ठराव मंगळवारी पोलीस दलाकडे सोपवण्यात येणार असून ठरावानुसार दारू विक्री आणि सेवन करणा:यांना दंड ठोठावण्यात येणार आह़े नंदुरबार तालुक्यातील सधन आणि रोजगाराभिमुख गावांपैकी एक असलेल्या लहान शहादे येथे गेल्या काही महिन्यात युवकांमध्ये मद्याचे व्यसन वाढल्याने भांडणे वाढीस लागली आहेत़ तसेच अनेकांच्या कुटूंबांची वाताहत झाली आह़े दारूच्या व्यसनामुळे अनेक जण कजर्बाजारी होऊन त्यांच्या कुटूंबांवर उपासमारीचे संकट येत होत़े यातून सावरण्यासाठी लहान शहादा येथील महिलांनी पुढाकार घेत गावात दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतीकडून करून घेतला आह़े सरपंच सुपाबाई भिल व सदस्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत गावात मद्यसेवनाचे प्रमाण वाढल्याने निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली़ ब:याच घरांमध्ये कुटूंबप्रमुख मद्याच्या आहारी गेल्याने त्यांची वाताहत होत असल्याची सद्यस्थिती महिलांनी कथन केली़ यामुळे सरपंच आणि सदस्य यांनी मिळून गावात तात्काळ दारूबंदीचा ठराव मांडून तो संमत करून घेतला़ या ठरावादरम्यानच यापुढे गावात दारूविक्री करणा:यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली़ गावात दारू विक्री करताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला 50 हजार रूपयांचा दंड करण्यात आला़ विशेष म्हणजे व्यसनातून युवकांना पूर्ण मुक्त करून आणण्यासाठी बाहेरगावाहून दारू पिऊन आल्यास 10 हजार रूपयांचा दंड करण्यात येणार आह़े गावात कोणाकडे लगA समारंभ असल्यास त्यावेळी दारूऐवजी शरबत देण्याचा ठरावही करण्यात आला़ या ठरावावर योग्य पद्धतीने कारवाई करण्यात यावी, यासाठी महिला आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा समावेश असलेली दारूबंदी समिती निर्माण करण्यात आली आह़े या समितीकडून गावातील विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रमांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवण्यात येणार आह़े गावातील शिलाबाई भिल, रमिलाबाई पाडवी, सुनिताबाई भिल यांच्यासह 100 महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आह़े यावेळी राजू पाडवी, छोटूलाल भील, दिनेश भील, सुरेश भील, सुदाम भिल विजय ठाकरे, पिंटू भिल, राजू भिल, गणेश भिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत़े मंगळवारी महिला आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उपनगर पोलीस ठाणे किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना ठरावाची प्रत देण्यात येऊन दारूबंदीसाठी सहकार्य करण्याबाबत कळवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गावातील सर्वानीच महिलांच्या या निर्णयाचे स्वागत केले आह़े गावात शेतीकामे मोठय़ा प्रमाणावर असूनही केवळ व्यसनांमुळे अनेकजण जात नव्हत़े आता मात्र परीस्थिती बदलणार असल्याचे युवकांनी सांगितल़े
दारूबंदीसाठी लहान शहादे येथे महिलांचा ग्रामसभेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:14 PM