लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील महिलांनी दारुबंदी करण्याबाबत पुढाकार घेतला आह़े याबाबत त्यांनी ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मांडून संपूर्ण गावात दारुचे उत्पादन व विक्री बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले आह़ेठाणे पाडा येथे ग्रामसभा घेण्यात आली होती़ त्यात, ग्रामस्थांसह गावातील महिलांनी गावात पूर्णपणे दारुबंदी करण्यात यावी अशी मागणी केली रितसर तसा ठराव (क्ऱ10) मांडण्यात आला व त्याला एकमताने पारित करण्यात आला़ त्यानुसार या दारुबंदीच्या ठरावाची प्रत व आपल्या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना संबंधित महिलांकडून देण्यात आल़े महिलांना दारुबंदीबाबत मागील ग्रामसभेतदेखील चर्चा घडवून आणली होती़ परंतु यंदाच्या ग्रामसभेत महिलांनी दारुबंदीचा विषया लावून धरला व हा ठराव पुन्हा चर्चेत आणून त्याला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली़ महिलांनी या वेळी केवळ गावात दारुबंदीच नव्हे तर, गावात दारु तयार होऊ नये व त्याची विक्री वर पुर्णत बंदी घालावी अशी मागणीही केली़ जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर राहीबाई गावीत, रेवतीबाई सोनवणे, कलीबाई पवार, काशिबाई पवार, शबीबाई चौधरी, लक्ष्मीबाई कुवर, संगिताबाई बागूल, संगिताबाई पवार, सुमित्रबाई चौधरी, लालुबाई मोरे, महारी माळचे, गंगुबाई गावीत, कलुबाई पवार, लालाबाई पवार, ताराबाई पवार आदींच्या स्वाक्ष:या आहेत़
ठाणेपाडा येथे दारुबंदीसाठी महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:20 PM