लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : लोकसहभागातून निझरा नदी नांगरटी करुन केलेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोड गावक:यांच्या आनंदात पारावार उरला नाही. तब्बल चार लाख रुपये खर्च करून हे काम करण्यात आले.निझरा नदी नांगरटीसाठी गेल्यावर्षी लोकसहभागातून चार लाख गोळा करून 13 खड्डे पोकलॅण्डद्वारे करण्यात आले होते. परंतु पाऊसच न झाल्याने ग्रामस्थ हताश झालेत. परंतु यावर्षी 24 जूनला पाऊस झाला. त्यात सहा खड्डे भरले. मात्र उर्वरित राहिलेले खड्डेही पाण्याने भरावेत म्हणून पडत्या पावसात निझरा नदीला शेत जमिनीतून आलेले पावसाचे पाणी पोकलॅण्डद्वारे तयार केलेल्या खड्डय़ांमध्ये वळवण्यात आले आल्याने हे खड्डेही हळू हळू भरण्यास सुरूवात झाली. यासाठी सरपंच जयसिंग माळी, पुरूषोत्तम चव्हाण, डॉ.पुंडलिक राजपूत, दिलीप कथ्थू पाटील, दिलीप दामू चौधरी, किरण सखाराम चौधरी, रमण चौधरी, मनोज सुरेश चौधरी, आदींनी प्रय} केले. गेल्या काही दिवसांवर निझरा नदीत पावसाचे पाणी आल्याने पात्रातील खड्डे भरल्याने बोरदसह मोड परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
लोकसहभागातून झालेल्या कामाचे मिळाले फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:12 PM