भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी म्हण ‘शासनकारण’ सुरू झाल्यानंतर प्रचलित झाली़ मात्र नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या म्हणीला पूर्णपणे छेद देत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आह़े यामुळे कागद ते कागद असा प्रवास करणा:या सामान्यांच्या ‘समस्या’ वेगाने सोडवण्याचा प्रयत्न होत आह़े राज्यात ई-गव्र्हनन्स राबवून कागदाचा कमीत कमी वापर आणि वेगात काम करण्यासाठी प्रयत्न सुरू होत़े यातून 2014 मध्ये यासाठी नॅशनल ईन्फरेमेशन सेंटरने ई-ऑफिस ही प्रणाली राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला होता़ हा प्रयत्न आजघडीस नंदुरबार जिल्ह्यात पूर्णपणे यशस्वी ठरला असून ई-ऑफिसद्वारे वर्षाला आठ हजार फाईंलींवर यशस्वीपणे कामकाज करून त्यांचा निपटारा होत आह़े नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील 22 विभाग या ई-ऑफिस प्रणालीसोबत जोडले असून एकदा तयार केलेली फाईल ही प्रत्येक विभागाला अवलोकन करून पाठवून शेवटी त्यावर निर्णय होतो आह़े अत्यंत सोप्या पद्धतीने होणा:या या कामकाजामुळे सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणा:या योजना अधिक गतीमान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाकडून येत्या 2018 मध्ये सर्व सहा तहसील कार्यालय आणि दोन प्रांताधिकारी कार्यालय येथेही ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येत आह़े विशेष म्हणजे सर्वच अधिकारी ई-ऑफिस प्रणालीद्वारे घरी बसून शासकीय कामकाज पूर्ण करू शकत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
एका वर्षात आठ हजार फायलींवर कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:06 PM
टेक्नीसेव्ही प्रशासन : नंदुरबार जिल्हा ई-ऑफिस वापरात राज्यात तिसरा
ठळक मुद्देवर्षभरात 28 हजार वेळा अवलोकन राज्यात कोकण विभागात सिंधूदुर्ग, औरंगाबाद विभागातून जालना आणि नाशिक विभागातून नंदुरबार अशा तीन ठिकाणी 2014 पासून ई-ऑफिसद्वारे कामकाज केले जात़े एका विभागातून दुस:या विभागात देण्यात येणा:या कागदपत्रांचे एकदाच स्कॅनिंग करून ते